Monday, July 6, 2026
Homeजळगावमहाविद्यालयीन विद्यार्थिनीला निलेश कुंभार याचा त्रास : विनयभंग व धमकीप्रकरणी तक्रार दाखल

महाविद्यालयीन विद्यार्थिनीला निलेश कुंभार याचा त्रास : विनयभंग व धमकीप्रकरणी तक्रार दाखल

महाविद्यालयीन विद्यार्थिनीला निलेश कुंभार याचा त्रास : विनयभंग व धमकीप्रकरणी तक्रार दाखल

Oplus_131072

<img class

वरणगाव            खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          ता भुसावळ दि १०
वरणगाव येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने निलेश लहु कुंभार (रा. फुलगाव) याच्याविरुद्ध विनयभंग व धमकी दिल्याची गंभीर तक्रार दाखल केली आहे. ही घटना ३ सप्टेंबर २०२५ रोजी मुक्ताईनगर – वरणगाव महामार्गावर घडली असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार मुलगी ही महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव येथे ११ वी मध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या म्हणण्यानुसार, निलेश कुंभार याच्याशी तिची ओळख दोन वर्षांपूर्वी क्लासमध्ये झाली होती.२ सप्टेंबर रोजी रात्री त्याने फोन करून दुसऱ्या दिवशी मुक्ताईनगर येथे जाण्याबाबत सांगितले. ३ सप्टेंबर रोजी दुपारी निलेशने तिला अंबिका ज्वेलर्समध्ये नेऊन जबरदस्तीने एक चांदीची चैन दिली आणि नंतर हायवेवरील ढाब्यावर जेवण केले.

दुपारी सुमारे ३ वाजता पाऊस सुरू झाल्याने दोघे झाडाखाली थांबले असता, निलेश कुंभार याने पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्या भांगेत कुंकू टाकून, गळ्यात हात टाकत तिच्या गालाचे चुंबन घेतले. पीडितेने विरोध केल्यानंतर त्याने तिच्या वडील व भावाला मारण्याची धमकी दिली.तसेच,तिचे फोटो काढल्याचेही तिने सांगितले आहे.

या प्रकारामुळे मुलीच्या मनाला तीव्र मानसिक धक्का बसला असून, तिने कोणत्याही दबावाखाली न येता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या