Friday, May 1, 2026
Homeजळगाव२० वर्षीय तरुणाची आत्महत्या; बोहर्डी बु॥ गावात गळफास लावून जीवनयात्रा संपवली

२० वर्षीय तरुणाची आत्महत्या; बोहर्डी बु॥ गावात गळफास लावून जीवनयात्रा संपवली

२० वर्षीय तरुणाची आत्महत्या; बोहर्डी बु॥ गावात गळफास लावून जीवनयात्रा संपवली

वरणगाव,     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              ता. भुसावळ ; दि १५
तालुक्यातील बोहर्डी बु॥ गावात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.१५ सप्टेंबर) पहाटे उघडकीस आली.देवानंद गजानान गोपाळ (वय २० वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,ही घटना दि.१५ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ४ वाजता घडली.घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्य रमेश रायसिंग गोपळ (वय ६५) यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली.

खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार प्रतापसिंग बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल यासिन पिजारी आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला.या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (अ.मृ. क्र. ३०/२०२५) करण्यात आली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून, एक तरुण आयुष्याच्या उंबरठ्यावर असताना असे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या