Friday, May 1, 2026
Homeजळगाववरणगांव फॅक्टरीत राजपूत समाज मंडळातर्फ गुणवंताचा सत्कार संपन्न

वरणगांव फॅक्टरीत राजपूत समाज मंडळातर्फ गुणवंताचा सत्कार संपन्न

वरणगांव फॅक्टरीत राजपूत समाज मंडळातर्फ गुणवंताचा सत्कार संपन्न

भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – वरणगाव फॅक्टरी राजपूत समाज उन्नती मंडळाच्या वतीने राजपूत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला.

या प्रसंगी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त सत्र न्यायाधीश, करुणाताई राजपूत , स्टेट बँक व्यवस्थापक ऋषिकेश पाटील , शिवसेनेचे समाधान महाजन ,भरतसिंह आप्पा पाटील, दिलीपसिंह पाटील ,कोमलसिंह राजपूत ,दामोदरसिंह राजपूत,विलाससिंह पाटील ,संदीपसिंह राणा,सारिका राजपूत ,विक्रमसिंह राजपूत,प्रा. संजयसिंह राजपूत मान्यवर मंचावर उपस्थित होते.

या प्रसंगी करुणाताई राजपूत यांनी अध्यक्षीय भाषणात राजपूत समाजाच्या ऐतिहासिक परंपरा, शौर्य व शिक्षणातील प्रगती यावर भर देत विद्यार्थ्यांना देशहितासाठी प्रेरित होण्याचे आवाहन केले.त्यांनी म्हटले की, “विद्यार्थ्यांनी फक्त शैक्षणिक यश नव्हे तर समाजासाठी आदर्श नागरिक होण्याचे ध्येय ठेवावे.”कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यपालसिंह राजपूत यांनी केले.सूत्रसंचालन जगदीश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन एस.सी.पाटील सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष सी.एल.पाटील,सचिव प्रविण पाटील,जे.के. पाटील सर,पंकज जाधव,बाबूलाल पाटील, स्वप्नील राजपूत,दिपक पाटील,चंचल सिंग राजपूत आणि इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या