Tuesday, June 30, 2026
Homeजळगावगौ रक्षणासाठी अभयारण्याची गरज

गौ रक्षणासाठी अभयारण्याची गरज

गौ रक्षणासाठी अभयारण्याची गरज

(पाल वृंदावन धाम आश्रमात गौ शाळेच्या उदघाटना प्रसंगी खासदार स्मिताताई वाघ यांची शासनाला विनंती )

पाल रावेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                     पाल ता रावेर :- गोमूत्रामुळे कर्करोगासारखे आजार आणि तिच्या शेणामुळे शेतात खत व प्रदूषणा वर आळा घालता येते. दैवी कार्यात सुद्धा उपयुक्त आणि गाईचे दूध हॆ अमृततुल्य असल्याने प्रत्येकाने गायींचे रक्षण केले पाहिजे तसेच त्यांचा बळी टाळण्यासाठी त्यांच्यासाठी एक अभयारण्य बांधले पाहिजे. सर्व संतांसोबत आम्ही गायींचे रक्षण करू आणि त्यांच्यासाठी सरकारी मदतीची मागणी करत राहू.असे परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृंदावन धाम पाल येथील गौशाळेच्या उदघाटन सोहळा प्रसंगी खासदार स्मिताताई वाघ यांनी भावना व्यक्त केले.

दि २९ जून रोजी रावेर तालुक्यातील श्री वृंदावन धाम पाल आश्रमात विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात महाराष्ट्र गौसेवा आयोगाच्या गौ वर्धन गौवंश सेवा केंद्र योजने अंतर्गत पाल आश्रमातील श्री हरी गोपाल गौशाळेचे शेड निर्माण कार्य पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आले. यामध्ये प्रमुख अतिथी जळगाव च्या खासदार स्मिताताई वाघ,खंडवा चे खासदार श्री ज्ञानेश्वर पाटील, नेपानगर आमदार श्रीमती मंजू दादू,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,महामंडलेश्वर स्वामी पवनदास जी महाराज,ह भ प मानेकर बाबा शाश्री, श्री योगी दत्त नाथ जी महाराज, श्री राघवानंद भारती जी महाराज,श्री विशद्धानंद सरस्वती जी महाराज, श्री हरिशरनंद जी महाराज, श्री भरत जी महाराज अंजाळेकर,अनंत प्रकाश शास्त्री जी महाराज,श्री श्याम चैतन्य जी महाराज, श्री विजयदास जी महाराज,श्री धनंजय चौधरी, माजी खासदार हरिभाऊ राठोड, चंद्रशेखर चिखले, भीमसिंग राठोड,डॉ रणजित पाटील, डॉ रोहिदास राठोड, चंद्रशेखर नलावडे,आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम गौ शाळेचे उदघाटन करून दीपप्रज्वलन करून आलेल्या अतिथीचे सत्कार करण्यात आले. त्यानंतर मनोगत व्यक्त करतांना पुढे योगी दत्तनाथ जी महाराज यांनी हा आयोग देशभरात लागू करण्यात आलेला नाही तो फक्त महाराष्ट्र सरकारने लागू केला आहे आणि त्याद्वारे गोशाळांसाठी अनुदान मिळत असून अत्यंत चांगले कार्य सुरु आहे परंतु विडंबना ही आहे की देशात सर्वाधिक हिंदू सनातनी असूनही आम्हाला गोशाळांसाठी अनुदान स्वीकारावे लागते. प्रत्येकाला वाटते की आज आपला वाढदिवस आहे म्हणून केक आणि इतर गोष्टींवर पैसे खर्च करण्याऐवजी ते पैसे गोशाळेला दान करून गायीची सेवा करता येईल.

चंद्रशेखर नलावडे यांनी आपण शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर टाळला पाहिजे, कारण ती विषारी असतात. हे टाळण्यासाठी, आपण गोमातेचे रक्षण केले पाहिजे आणि जर तिचे शेण शेतात वापरले, तर आपल्याला रासायनिक खतांची गरज भासणार नाही. म्हणून, गोसंरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.श्री मानेकर बाबा शास्त्री महाराज यांनी गोशाळा चालवणे आणि या पुण्यकर्मात सहभागी होणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

डॉ. रणजित पाटील यांनी एक डॉक्टर म्हणून गायींकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे कारण त्यांचे असंख्य फायदे आहेत. देशी गायींच्या दुधात आयुर्वेदिक घटक असतात. केवळ गोमूत्राचेही असंख्य फायदे आहेत.गाव,शहरात राहणाऱ्या अनेक गायींच्या पोटातून शस्त्रक्रियेदरम्यान प्लास्टिक काढले जाते, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की ते प्लास्टिक रस्त्यावर न टाकता कचरा कुंडीत टाका.

श्री अनंत प्रकाश शास्त्रीजी महाराज यांनी गोमाता आपल्या आर्थिक आणि आध्यात्मिक विकासात योगदान देते. भगवान कृष्णाने स्वतःला राजा न म्हणता गोपाल म्हणवून घेणे पसंत केले. म्हणून, प्रत्येक घरात गाय असावी आणि गोशाळेत तिची सेवा करावी, असा संकल्प करून आपण गोमातेची सेवा केली पाहिजे.

श्री हरिभाऊ राठोड यांनी पूज्य बापूजींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी गोपाल बाबाजींची असलेली निष्ठा त्यांच्या चैतन्य साधक परिवाराला पुढे नेत आहे.खंडवा चे खासदार श्री ज्ञानेश्वर पाटील यांनी श्रद्धेय गोपाल बाबाजी पूज्य बापूजींचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करत आहेत. ते गोशाळा बांधून गोमातेची सेवा करत आहेत. गायींवर शेण, खत, मूत्र आणि दुधाची चाचणी करून अनेक आजार बरे झाल्याचे दिसून आले आहे. चैतन्य साधक परिवाराच्या माध्यमातून या गोशाळेचे उद्घाटन करून एक अत्यंत पवित्र कार्य केले गेले आहे. ह भ प भरत महाराज यांनी जर आपल्याला देशाचे भले करायचे असेल, तर कृषी, गोसेवा आणि व्यवसायाला प्रोत्साहन देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या गावाला पाल म्हणतात आणि आज येथे एका गोशाळेचे उद्घाटन होत आहे. या पालमध्ये होणारे गोपालन गोपाल यांच्या माध्यमातून केले जात आहे.

अन्न व उपजीविका समिती चे

 

चंद्रशेखर चिखले यांनी पूज्य बापूजींच्या आशीर्वादाने आणि बाबाजींच्या मार्गदर्शनाने येथील काम वेगाने पुढे जात आहे.

नेपानगर आमदार मंजू दादू यांनी गायींची सेवा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण थोडे स्वार्थी होऊया, आणि गोसेवा करणे अत्यंत आवश्यक आहे. हा माझाही परिवार आहे, म्हणून मी तुमची काळजी घेत असताना, तुम्हा सर्वांना गोपालन करण्याची विनंती करते.

श्री राघवानंद जी भारती महाराज यांनी गौ सेवा करणे फार पुण्यचे कार्य असून राग, द्वेष व स्वार्थी भाव सोडून या कार्यात सर्वांनी सहभागी होऊन गाईला लागणाऱ्या चाऱ्यांची व्यवस्था करावी.महामंडलेश्वर श्री पवनदास जी महाराज यांनी आपण अशा धर्मात जन्मलो आहोत जिथे गोमातेची पूजा केली जाते, हे आपले परम भाग्य आहे. आपले मल आणि मूत्र अत्यंत अपवित्र आहे, परंतु गोमातेचे मलमूत्र अमृतासारखे आहे. आपण ते आपल्या आरोग्यासाठी वापरतो,व शेतीत खत म्हणूनही त्याचा उपयोग होतो.म्हणून, आपण सर्वांनी गायींची सेवा केली पाहिजे.

श्री धनंजय चौधरी यांनी पूज्य बाबाजींनी पदस्थ स्वीकारल्यापासून ते आध्यात्मिक कार्यात गुंतले आहेत. परिणामी, त्यांनी हे गोशाळा उभारण्याचे महान कार्य हाती घेतले आहे. पूज्य बाबाजींसोबत, या सेवेसाठी वेळ आणि सहकार्य देण्याची जबाबदारी आपल्यावरही आहे. ही गोशाळा बांधून त्यांनी एक महान कार्य केले आहे.

श्री राघवानंदजी महाराज पूज्य बापूजींनी वृंदावन धाम बांधले, त्याचप्रमाणे त्यांच्या शिष्याने गोवर्धन बांधले. आपल्या बुद्धीनुसार जसे जमेल तसे जगा. आपल्या संपूर्ण हृदयाने, मनाने आणि पैशाने गायींची सेवा करा.त्यानंतर महाआरती होऊन विवरा समिती कडून महाप्रसादाचे आस्वाद घेण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या