Friday, May 1, 2026
Homeजळगावशहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

वरणगाव             खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         ता भुसावळ दि १४ सप्टेंबर :
शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.मागील काही आठवड्यांमध्ये लहान मुलांवर व वयोवृद्धांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून,काही जणांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.

वाहनचालकही यामुळे त्रस्त असून अचानक रस्त्यावर धावणाऱ्या कुत्र्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.याशिवाय,कुत्र्यांमुळे रेबीजसारख्या रोगांचा धोका वाढत चालला आहे.आरोग्य विभागाकडूनही यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर वरणगाव नगरपरिषदेकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.शहरातील अनेक भागांमध्ये कुत्र्यांच्या टोळ्या फिरताना दिसत असून, शाळेजवळ व रस्त्यांवर कुत्र्यांचा वावर अधिक प्रमाणात आहे.

नगरपरिषदेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,कुत्र्यांचे निर्बंध,लसीकरण आणि आवश्यक त्या उपाययोजनांसाठी लवकरच मोहीम राबवली जाणार आहे.नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी आणि आवश्यक ती माहिती प्रशासनाला द्यावी.”
दरम्यान, प्राणी कल्याण संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी देखील पुढे येऊन नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुत्र्यांना हानी न करता त्यांचे पुनर्वसन आणि लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.शहरातील वाढता कुत्रा उपद्रव ही सामाजिक व आरोग्यदृष्ट्या गंभीर बाब बनत चालली असून, यावर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या