वरणगावमधील मित्र परिवाराचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद : चंद्रकांत बढे
वरणगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – वरणगावमधील मित्र परिवार गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील शोषित व वंचित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत पुरवण्याचे कार्य करत असून, या उपक्रमाचे कौतुक करताना चंद्रकांत बढे सर म्हणाले की, “शिक्षण हेच खऱ्या अर्थाने परिवर्तनाचे साधन असून, प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याची संधी मिळावी यासाठी आपण सर्वांनी पुढे यायला हवे.
यावेळी प्रमुख पाहुणे चंद्रकांत बढे सर,भैय्या साहेब देशमुख,दिनकर सोनवणे,गणेश चौधरी, मुख्याध्यापीका वनिता सोनवणे,आदी मान्यवरांचे शाळेच्या वतीने फुलपुष्प देवून स्वागत करण्यात आले.तसेच मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वह्या,पेन,पेन्सील,खोडरबर, डबा पाण्याची बाटली कंपास इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले.
बढे सर पुढे म्हणाले की,शिक्षणामुळे केवळ वैयक्तिक प्रगती होत नाही,तर संपूर्ण समाजात सकारात्मक बदल घडतो.आजही अनेक मुले आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून दूर राहतात.अशा परिस्थितीत समाजातील सज्जन,जबाबदार नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.मित्र परिवाराने ही सामाजिक जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून उचलली आहे.त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी आज सक्षमपणे आपले शिक्षण पूर्ण करत आहेत.”हे काम थांबता कामा नये,तर अजून विस्तारले गेले पाहिजे,आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे,”असा विश्वास सरांनी व्यक्त केला.
यावेळी कार्यकम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक विजया परदेशी,राकेश कुळकर्णी,खूशबू जावळे,उज्वला सोनवणे तसेच मित्र परिवाराचे सदस्य राजू खडसे,गणेश माळी , रवि तोताणी,नाना चौधरी,अशोक शर्मा आदीनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पोळ यांनी केले