Friday, February 27, 2026
Homeजळगावनदीत पाय घसरून नात गेली वाहून अन आजोबांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

नदीत पाय घसरून नात गेली वाहून अन आजोबांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

नदीत पाय घसरून नात गेली वाहून अन आजोबांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गेल्या दिवसांपासून जिल्ह्यातील पाचोरा व जामनेर तालुक्यात झालेल्या पावसामुळे सर्वच नदीला पाणी आले आहे. तर तालुक्यातील वडगाव टेक येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. लहानपणीच पितृछत्र हरपलेले… आई मजुरीसाठी बाहेरगावी गेलेली… अशातच आजोबांकडे (आईचे वडील) राहणारी १४ वर्षीय मुलगी हिवरा नदीत पाय घसरून पडल्याने वाहून गेली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, या धक्क्यामुळे तिचे पालनकर्ता असलेल्या आजोबांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अंगावर शहारे आणणारी ही घटना वडगाव टेक (ता. पाचोरा) येथे शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.नीता संजय भालेराव (१४) असे या वाहून गेलेल्या मुलीचे तर, शामराव विठ्ठल खरे (७२) असे आजोबांचे नाव आहे. ती मामीसोबत दुपारी एकच्या सुमारास हिवरा नदीवर धुणे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी पाय घसरल्यामुळे नीता नदीच्या प्रवाहात वाहून गेली. तिला वाचविण्यासाठी मामीसुद्धा नदीत उतरली; मात्र गावकऱ्यांनी उड्या मारून मामीचे प्राण वाचवले. ही दुर्दैवी घटना कळताच, नीता हिचे आजोबा शामराव खरे यांना धक्का बसला आणि काही वेळातच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. नीता ही पाचोरा येथे इयत्ता नववीत शिक्षण घेत होती. ती चार वर्षांची असताना वडिलांचा मृत्यू झाला तर आई मजुरीसाठी दुसऱ्या शहरात गेली आहे. आईचे वडील शामराव खरे यांच्याकडे नीता आणि तिची बहीण राहत होते. आता नीताही वाहून गेली तर घराचा आधार असलेले आजोबा नाहीत. आता शनिवारी तरी नीताचा शोध लागेल काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या