Thursday, February 26, 2026
Homeगुन्हासंतापजनक - महिलेला अंगावर ओढून अश्लील चाळे; जीवे ठार मारण्याची धमकी देत...

संतापजनक – महिलेला अंगावर ओढून अश्लील चाळे; जीवे ठार मारण्याची धमकी देत बेदम मारहाण !

संतापजनक – महिलेला अंगावर ओढून अश्लील चाळे; जीवे ठार मारण्याची धमकी देत बेदम मारहाण !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील पिंप्राळा परिसरात एका २६ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे. संशयित आरोपीने महिलेसोबत अश्लील चाळे करत तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, पिंप्राळा परिसरात राहणारी २६ वर्षीय पीडित महिला बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या घरा जवळील परिसरातून जात होती. यावेळी संशयित आरोपी आशिष पांडुरंग जोहरे (रा. पिंप्राळा, जळगाव) याने पीडित महिलेला अडवले. त्याने महिलेला जबरदस्तीने अंगावर ओढून तिच्यासोबत अश्लील चाळे केले.

मारहाण आणि धमकी !
केवळ विनयभंगच नाही, तर आरोपीने पिडीत महिलेला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी नराधमाने तिला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पीडित महिला प्रचंड मानसिक धक्क्याखाली आली होती. घटनेनंतर तिने तत्काळ कुटुंबियांना माहिती देऊन पोलीस ठाणे गाठले.

रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल !
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आशिष पांडुरंग जोहरे याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात दुपारी २:३० वाजेच्या सुमारास विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश माळी करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या