के.नारखेडे विद्यालयात राज्यस्तरीय स्मृती स्पर्धांचे उद्घाटन संपन्न..
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दिनांक 21 सप्टेंबर 2025, रविवार, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळ संचालित के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भुसावळ येथे संस्थेचे आद्य संस्थापक थोर साहित्यिक, शिक्षणमहर्षी स्वर्गीय बाबासाहेब के. नारखेडे यांच्या ४५ व्या पुण्यतिथिनिमित्त राज्यस्तरीय निबंधलेखन, वक्तृत्व,उत्स्फूर्त वक्तृत्व व सुगम संगीत तसेच शिक्षकांसाठी कथा, काव्य लेखन, लेखकांसाठी कथासंग्रह,काव्यसंग्रह व कादंबरीलेखन इत्यादी राज्यपुरस्कार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धांचे उद्घाटन दिनांक २१ सप्टेंबर २०२५ वार रविवार रोजी सकाळी ८:00 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्था सेक्रेटरी मा. श्री. पी. व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. संदीपजी बिंद्रा प्रमुख अतिथी उपस्थित होते. राज्यस्तरीय स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन प्रा. श्रीमती. निलिमा वसंत वारके, असोशिएट प्रोफेसर व्ही. ई. एस. इन्स्टिट्यूट,चेंबूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला व्यासपीठावर संस्थेचे सभासद मा. श्री. भाग्येश मकरंद नारखेडे, ऑनररी जॉईंट सेक्रेटरी श्री. प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे, संस्था सभासद श्री. पी.ई. नेमाडे उपस्थिती होते.
तसेच स्व. बाबासाहेब के. नारखेडे स्मृतिदिनानिमित्त आयोजित विविध आंतरवर्गीय स्पर्धांचे उद्घाटन याप्रसंगी सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
बालवैज्ञानिक स्पर्धेचे उद्घाटन श्री. प्रमोदभाऊ नेमाडे यांच्या हस्ते, हस्तकला स्पर्धेचे उद्घाटन श्री. पी. व्ही. पाटील यांच्या हस्ते तसेच I.T. SOFT FUSION या स्पर्धेचे उद्घाटन मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक श्री. संदिपजी बिंद्रा यांच्या हस्ते व ELECTS VISION या स्पर्धेचे उद्घाटन संस्था सभासद भाग्येश नारखेडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. श्री. किशोर एन. नारखेडे, चेअरमन श्री. श्रीनिवास एन. नारखेडे, सदस्य डॉ. संजीव नारखेडे यांनी कार्यक्रमाला भ्रमणध्वनीद्वारे आपला शुभेच्छा संदेश पाठविला.
सदर कार्यक्रमाला व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. वाय.एन झोपे, उपमुख्याध्यापिका श्रीमती संगीता अडकमोल मॅडम उपस्थित होते. तसेच पर्यवेक्षक श्री. एस.एल. राणे पर्यवेक्षक श्री. एस. पी. पाठक , संगणक विभाग प्रमुख श्री. बी. ए.पाटील सर व संगणक विभागसहित विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख सौ. एन.एस. पाटील यांनी केले. उपस्पर्धा प्रमुख मनोज तडवी सर यांनी स्पर्धकांना सूचना दिल्या. प्रमुख अतिथी श्री. संदीपजी बिंद्रा यांचा प्रेरणादायी परिचय श्री. एस.डी वासकर यांनी तर प्रमुख उद्घाटक प्रा. श्रीमती. निलिमा वसंत वारके यांचा परिचय श्रीमती एन. के. बाविस्कर टीचर यांनी करून दिला. परीक्षक सत्कार यादी वाचन सौ.एस. एस. तळले मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शुभांगी पाटील मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती संगीता अडकमोल मॅडम यांनी केले.

