Saturday, May 16, 2026
Homeजळगावशिवसेना महिला जिल्हाध्यक्ष यांच्या मदतीने अपघातग्रस्ताचे प्राण वाचले

शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष यांच्या मदतीने अपघातग्रस्ताचे प्राण वाचले

शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष यांच्या मदतीने अपघातग्रस्ताचे प्राण वाचले

 

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

शिवसेना जिल्हाध्यक्ष नंदा प्रकाश निकम यांच्या त्वरीत हस्तक्षेपामुळे साई पुष्प हॉस्पिटलच्या मदतीने मुक्ताईनगर मतदारसंघातील एक रुग्णाला वेळेत वैद्यकीय सहाय्य मिळाले. घटना सावदा येथील असून रुग्ण यशवंत प्रकाश चौधरी रा सावदा हे १५ मे रोजी रस्ता अपघातात जखमी झाला होते.

माहितीनुसार, मुक्ताईनगरचे आमदार श चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष नंदा यांना ताबडतोब फोन करून सांगितले की, हा पेशंट अतिशय नाजुक अवस्थेत आहे, आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलकडून मदत करावी.” नंदाताईंनी ताबडतोब संबंधितांना संपर्क साधला. सावदा येथील उपतालुकाप्रमुख रीता भंगाळे आणि संगीता भंगाळे यांना सूचना देऊन पुढील व्यवस्था करण्यास सांगितले.

 

Oplus_131072

नंदा निकम यांनी भुसावळ येथील डॉक्टर निलेश महाजन यांच्याशी संवाद साधून रुग्णाला वैद्यकीय मदत मिळावी असे मागणी केली. डॉक्टरांनी रुग्णाची परिस्थिती तपासून सरकारी योजना व हॉस्पिटलच्या सुविधांद्वारे आवश्यक उपचार करून घ्यावे असे केले. डॉक्टरांनी योजनेअंतर्गत रुग्णाला लागणारी मदत मिळवून दिली व त्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधारल्यामुळे त्याला सुखरूप घरी परत पाठवण्यात आले.

या वेळी आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील, जिल्हाध्यक्ष नंदा प्रकाश निकम, उपतालुकाप्रमुख रीता भंगाळे, संगीता बंगाळे आणि डॉक्टर निलेश महाजन यांनी रुग्णाच्या त्वरित मदतीस योगदान केल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. स्थानिकांनी या वेळी प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाने घेतलेल्या तातडीने निर्णयाचे कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या