भुसावळ विभागात जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त जनजागृती रॅली संपन्न

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील रेल्वे विभागात जागतिक पर्यावरण दिन 5 जून 2026 निमित्त दिनांक 16.05.2026 रोजी विविध जनजागृती व पर्यावरण जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्त विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे प्रवासी व नागरिकांना पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरित करण्यात आले तसेच सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश देण्यात आला.
याशिवाय, हेल्थ अँड एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट पथकाद्वारे रेल्वे वसाहतींमध्ये रॅली आयोजित करून रेल्वे कुटुंबातील सदस्यांना पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व प्लास्टिकमुक्त जीवनशैली स्वीकारण्याबाबत जागरूक करण्यात आले.
तसेच, विविध रेल्वे स्थानकांवर प्रवासी माहिती प्रणालीद्वारे पर्यावरण संरक्षण, स्वच्छता तसेच सिंगल यूज प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी संदेश प्रसारित करण्यात आले.
भुसावळ विभागामार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्यात येत आहेत.

