Friday, May 1, 2026
Homeजळगाववरणगाव शहरात लंपीचा फैलाव आणि कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वरणगाव शहरात लंपीचा फैलाव आणि कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वरणगाव शहरात लंपीचा फैलाव आणि कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पिसाळलेल्या गायीचा वृद्ध महिलेला जबर हल्ला; भाजपा पदाधिकाऱ्यांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            वरणगाव ता भुसावळ दि २२ :
वरणगाव शहरात सध्या लंपी आजाराने पुन्हा डोके वर काढले असून,मोकाट गुरे व कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शहरात बाहेरगावाहून ट्रकमधून सोडण्यात आलेल्या कुत्र्यांमुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.हे कुत्रे मोकाट जनावरांना चावत असून,परिणामी गायी पिसाळून नागरिकांवर हल्ले करत आहेत.

काल तिरंगा सर्कल परिसरात एका पिसाळलेल्या गायीने ज्येष्ठ महिला श्रीमती रेणुका माता साबळे यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली.भास्कर गावंडे यांच्या चहाच्या स्टॉलजवळ ही घटना घडली असून,गायीने त्यांना शिंगावर उचलून रस्त्यावर फेकले. यामुळे त्या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. यासह परिसरातील इतर नागरिकांनाही पिसाळलेल्या जनावरांकडून इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

शहरात लंपी आजाराने गायी व इतर जनावरांमध्ये झपाट्याने प्रसार केला आहे.या पार्श्वभूमीवर भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी यांनी नगरपरिषद व पशुवैद्यकीय विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.त्यांनी सांगितले की,शहरातील मोकाट कुत्रे आणि जनावरे लोकांच्या जिवितास धोका निर्माण करत आहेत.लंपीबाबत प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास स्थिती हाताबाहेर जाऊ शकते.”

 

या मागणीसाठी झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष सुनील काळे,नाना चौधरी,मिलिंद भैसे,कृष्णा माळी,मयूर शेळके,फझल शेख,अजमल खान, गोलू राणे,मिलिंद मेढे,पप्पू ठाकरे,बळीराम दादा सोनवणे,योगेश माळी,रमेश पालवे यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

नागरिकांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे की,मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा,लंपी आजारावर लसीकरण मोहीम तातडीने राबवावी,मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणावे आणि या जनावरांना गोशाळेत हलवण्याची प्रक्रिया सुरू करावी.
सध्या वरणगावमध्ये ज्येष्ठ नागरिक बाहेर पडण्यासही घाबरत असून,सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.प्रशासनाने तत्काळ पावले उचलली नाहीत,तर या समस्येचे गंभीर सामाजिक परिणाम भोगावे लागू शकतात,असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या