Thursday, July 23, 2026
Homeजळगावपंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त भुसावळ भाजपाच्यावतीने स्वच्छता अभियान राबविले

पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त भुसावळ भाजपाच्यावतीने स्वच्छता अभियान राबविले

पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त भुसावळ भाजपाच्यावतीने स्वच्छता अभियान राबविले

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भारतीय जनसंघाचे प्रणेते व ‘एकात्म मानववाद’ या तत्त्वज्ञानाचे जनक, स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तापी नगर येथील सप्तश्रृंगी माता मंदिर परिसरात हे अभियान पार पडले.

या उपक्रमाला महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची विशेष उपस्थिती लाभली. स्वच्छता अभियानानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले.

 

कार्यक्रमास भाजपाचे प्रदेश सचिव अजय भोळे, जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील, परिक्षीत बऱ्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष खुशाल जोशी, जिल्हा चिटणीस प्रविण इखणकर, उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, माजी प्रभारी नगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, प्रमोद नेमाडे, नगरसेवक पिंटू कोठारी, सतीश सपकाळे, अजय नागराणी, बोधराज चौधरी, निळकंठ भारंबे, शहर सरचिटणीस पवन बुंदेले, सागर चौधरी, जयंत माहुरकर, चेतन जैन, प्रशांत नरवाडे, बी. ए. पाटील, श्रेयस इंगळे, सुजित भोळे, योगेंद्र हरणे, ॲड. अभिजित मेणे, गिरीश पाटील, किरण सरोदे, उदय पाटील, राजू खरारे, लक्ष्मी मकासरे, अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, माधुरी चौधरी, भारती वैष्णव, वंदना सोनार, माधुरी एकनाथ चौधरी, राहुल तायडे, लखन रणधीर, संजय बोचरे, रवी दाभाडे, अल्बर्ट तायडे, शुभम पाटील, रितेश भारंबे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती घडवून आणण्यात आली असून, नागरिकांनीही स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या