वरणगाव महाविद्यालयात ‘महिलांच्या आरोग्य विषयक समस्या’ या विषयावर निबंध स्पर्धा संपन्न

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी वरणगाव ता भुसावळ दि २ ४ :
युवा कार्य आणि क्रिडा मंत्रालय,भारत सरकार यांच्या निर्देशानुसार आणि स्वच्छता ही सेवा अभियान 2025 अंतर्गत कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,वरणगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककाच्या वतीने ‘महिलांच्या आरोग्य विषयक समस्या’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ.विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून महिलांच्या आरोग्य विषयक समस्यांवर अभ्यासपूर्ण आणि सशक्त मते मांडली.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.नितीन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.यावेळी उपप्राचार्य डॉ.अनिल शिंदे आणि उपप्राचार्य डॉ.अशोक चित्ते यांची विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रमामध्ये प्रा.राहुल जोहरे (कार्यक्रम अधिकारी),प्रा.रजनी इंगळे (महिला कार्यक्रम अधिकारी),डॉ.बी.जी.देशमुख,डॉ.ए. एम.कलवले,प्रा.मनिषा इंगळे,डॉ.अनील पाटील,प्रा.संदीप शिंदे,प्रा.हेमराज मेतकर यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिला आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन,सामाजिक भान आणि उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण झाली, असे आयोजकांनी सांगितले.

