Friday, May 1, 2026
Homeजळगावभानखेडा येथील शिक्षक सुभाष इंगळे यांच्या निरोप समारंभात विद्यार्थ्यांना अश्रू अनावर

भानखेडा येथील शिक्षक सुभाष इंगळे यांच्या निरोप समारंभात विद्यार्थ्यांना अश्रू अनावर

भानखेडा येथील शिक्षक सुभाष इंगळे यांच्या निरोप समारंभात विद्यार्थ्यांना अश्रू अनावर

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          भुसावळ दि २४ सप्टेंबर –
जिल्हा परिषद केंद्र शाळा भानखेडा येथील मुख्याध्यापक सुभाष इंगळे सर यांचा आज शाळेत भावनिक निरोप समारंभ पार पडला. सहा वर्षे शाळेत उत्कृष्ट सेवा दिल्यानंतर त्यांची प्रशासकीय बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांसह उपस्थित शिक्षक,पालक आणि ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू आले. यावरून शिक्षकांचे कार्य व लोकप्रियता लक्षात येते .

इंगळे सरांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्टेज डेरिंग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत तसेच शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले.त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल झाले आहे.

शाळेच्या वतीने आयोजित या समारंभात इंगळे सरांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.याच कार्यक्रमात नव्याने रुजू झालेल्या शिक्षिका सौ.प्रतिभा चौधरी यांचेही शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुणभाऊ सोनवणे,दिलीप मतकर, पोलिस पाटील विठ्ठल पाटील,मकुंदा निकम, अमोल पाटील,राहुल मतकर,अशोक निकम, ऑपरेटर योगेश पाटील,ग्रामपंचायत शिपाई बापू लहु पाटील,विनोद पाटील,महेश इंगळे, प्रकाश पाटील,समाधान निकम,मोहन दोडके, दीपक सरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी इंगळे सरांच्या कार्याची प्रशंसा करत पुढील कार्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या .

हा निरोप समारंभ गावातील एक संस्मरणीय क्षण ठरला असून, इंगळे सरांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे भावनिक उद्गार गावकऱ्यांनी कार्यक्रमात बोलतांना काढले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या