भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – महात्मा गांधी विद्यालयात आज “स्वच्छता पंधरवाडा” अभियानाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वच्छतेबद्दलची सामाजिक जाणीव प्रकट केली.

कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, चित्रकला,भाषण स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य सी.जे.तायडे सर, उपप्राचार्य पी.एस.पाटील सर,पर्यवेक्षक झोपे सर,आशिष चौधरी सर,श्रीमती संगीता भंगाळे मॅडम, श्रीमती जयश्री निंबाळकर,जी.ए. बानाईत सर, तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सीमा ठाकूर मॅडम यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन एच.ए.महाजन सर यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबतची जाणीव अधिक दृढ होत असून,अशा उपक्रमांमुळे शाळेच्या सामाजिक सहभागालाही बळकटी मिळत असल्याचे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले.

