तालुक्यात अतिवृष्टी व दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत करा.
महाविकास आघाडीची मागणी.
यावल दि.३० खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तालुक्यात अतिवृष्टी व ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये तातडीची मदत व सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी महाविकास आघाडीने माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली यावल तहसीलवर मोर्चा काढून यावल तहसीलदार यांच्या मार्फत शासनाकडे केली आहे.
आज दि.२९ रोजी यावल तालुका महाविकास आघाडीने मोर्चा काढून यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांना लेखी निवेदन देऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
यावल तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसानझाले
आहे.शेतातील कपाशी,मका,ज्वारी, उडीद,मुग व केळी यांसारखी पिके पाण्याखाली गेली आहेत.मोठ्या प्रमाणात उभे पीक नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकट ओढवले आहे.महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही निवेदनावर सही करणारे पदाधिकारी यावेळी पुढील मागण्या करत आहोत यावल तालुक्यातील सर्व गावांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा.शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई व पिक विम्याचा लाभ देण्यात यावा.
सर्वांना प्रती हेक्टर १ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी व २०२४ – २५च्या केळी पिक विम्याच्या रक्कम भाजासह शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी
‘शेतकन्यांसाठी सरसकट कर्जमाफी योजना तात्काळ जाहीर करण्यात यावी.पंचनामे त्वरीत पूर्ण करून नुकसान भरपाईची रक्कम सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.शेतकऱ्यांना पीकपेरणीसाठी व उपजीविकेसाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे.
आपण या संदर्भात तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा दिलेल्या निवेदनावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष शेखर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, शिवसेना उबाटा तालुकाध्यक्ष शरद कोळी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपली स्वाक्षरी करून सौ.नाझीरकर यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले.