महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थिनींची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड
वरणगाव, खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी. ता भुसावळ दि. ३ ऑक्टोबर :
जळगाव येथे बुधवार, दि 1ऑक्टोबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये महात्मा गांधी विद्यालय,वरणगाव येथील दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत नाशिक विभागीय कराटे स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
या स्पर्धेमध्ये 19 वर्षांखालील वयोगटात लावण्या माळी आणि ऋतुजा सुरवाडे या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळ प्रदर्शन करत पुढील फेरीसाठी आपली निवड मिळवली.त्या दोघींनी जिल्हास्तरावर आपले कौशल्य सिद्ध करून संपूर्ण विद्यालयाचा गौरव वाढवला आहे.
या यशस्वी कामगिरीसाठी त्यांना क्रीडा शिक्षक आशिष चौधरी,लक्ष्मीकांत नेमाडे आणि एस. के.चौधरी सर यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत बढे सर,संस्थेच्या अध्यक्षा सौ.वंदनाताई पाटील मॅडम,सर्व कार्यकारिणी सदस्य,विद्यालयाचे प्राचार्य सी.जे.तायडे सर,उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक वर्ग तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
धुळे येथे होणाऱ्या नाशिक विभागीय कराटे स्पर्धेसाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत.

