Friday, May 1, 2026
Homeजळगावसंघ सर्वांचा, विरोधक नाही; समाज समरसतेने कार्य केल्यास भारत होईल परम वैभवशाली"

संघ सर्वांचा, विरोधक नाही; समाज समरसतेने कार्य केल्यास भारत होईल परम वैभवशाली”

संघ सर्वांचा, विरोधक नाही; समाज समरसतेने कार्य केल्यास भारत होईल परम वैभवशाली”

वरणगाव         खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी           ता भुसावळ :३ ऑक्टोबर :
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणाचाही विरोधक नाही,तर सर्वांना सोबत घेऊन समाजहिता साठी कार्य करणे हीच संघाची परंपरा आहे. समाजात भेदभाव न ठेवता समरसतेने, एकतेने कार्य केल्यास भारत पुन्हा परम वैभवशाली राष्ट्र बनू शकतो,”असे प्रतिपादन
अजय लक्ष्मण सुर्यवंशी (संत संपर्क प्रांत मंडळ सदस्य, शेंदुर्णी) यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव गुरुवारी शहरातील महात्मा गांधी विद्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवकांमध्ये विशेष ऊर्जा आणि उत्साह दिसून आला. यानिमित्ताने पारंपरिक शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

संविधानातील मूल्यांचे पालन आणि पंच परिवर्तनावर भर -या कार्यक्रमात बोलताना अजय सुर्यवंशी म्हणाले,”संविधानात उल्लेख असलेल्या न्याय,स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि अखंडतेच्या मूल्यांचे प्रत्येक नागरिकाने पालन करणे आवश्यक आहे. डॉ. हेडगेवार यांना परकीय आक्रमणाचे मूळ कारण समाजातील फूट हे जाणवले होते. त्यामुळे ‘स्व’ची ओळख करून देणं आणि त्यानुसार कार्य करणं महत्त्वाचं आहे.”

ते पुढे म्हणाले की, संघाने सुचवलेल्या ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनांच्या माध्यमातूनच खरे समाज परिवर्तन घडवून आणता येते.
या पंच परिवर्तनात स्वबोध,नागरिक कर्तव्य पालन,कुटुंब प्रबोधन,पर्यावरण संवर्धन, समरसताया पाच बाबींचा समावेश आहे, आणि या क्षेत्रात प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात समाजप्रमुखांची उपस्थिती –

या प्रसंगी डॉ.अनिल साहेबराव पाटील (बळीराजा कृषी केंद्र, वरणगाव ),मकरंद वामन झोपे (मा.तालुका संघचालक)
यांच्यासह अनेक मान्यवर, स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या