सोहेल कच्ची यांचा इंदूरमध्ये रोबोटिक्स स्पर्धांमध्ये जलवा !

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी. ता भुसावळ : दि ३ऑक्टोबर : वरणगाव येथील टीम रोबोटिक्सचे संस्थापक सोहेल कच्ची यांनी इंदूर येथे पार पडलेल्या दोन राष्ट्रीय स्तरावरील रोबोटिक्स स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे.सोहेल कच्ची आणि त्यांचा कनिष्ठ सदस्य सुमेध बनसोडे हे मध्य प्रदेशातील इंदूर येथे झालेल्या अॅक्रोपोलिस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या “टेक उत्सव” आणि स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या “टेक फ्लेअर” या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सवात सहभागी झाले होते.
टेक उत्सव २०२५ मध्ये, टीमने खालीलप्रमाणे यश मिळवले –
लाईन फॉलोअर स्पर्धा प्रथम क्रमांक,
रोबो सॉकर स्पर्धा दुसरा आणि तिसरा क्रमांक,तर,टेक फ्लेअर या स्पर्धेत त्यांनी रोबो सॉकर स्पर्धेत दोन्ही प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावले.
सोहेल कच्ची हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्यांना रोबोटिक्स आणि नवोपक्रमांची विशेष आवड आहे.ते आतापर्यंत भारत भरात १०० हून अधिक रोबोटिक्स स्पर्धांचे विजेते राहिले आहेत.विशेष म्हणजे,त्यांनी स्पेन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नवोपक्रम शिखर परिषदेत अंतिम फेरी गाठण्याचा मानदेखील मिळवला आहे.
या यशानंतर सोहेलने आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालक,शुभचिंतक आणि प्रवासाचे प्रायोजक यांना दिले.त्यांनी विशेषतः कादिर शेख (ग्रीन मोबाइल),अझरुद्दीन शेख (केजीएन स्क्रॅप),रिझवान इक्बाल ठेकिया आणि हमीद कच्ची यांचे आभार मानले.
सोहेल आणि टीम रोबोटिक्सचे हे यश तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत असून वरणगावच्या नावाला नवा आयाम देणारे आहे.
तांत्रिक शिक्षण,नवोपक्रम आणि रोबोटिक्समध्ये भारताचे भवितव्य घडवणाऱ्या अशा तरुणांचा उत्साह निश्चितच गौरवास्पद आहे !

