Friday, May 1, 2026
Homeयावलअंजाळे शिवारात शासकीय जागेवर अवैध गौण खनिज उत्खनन करणारे १ जेसीपी मशीनसह...

अंजाळे शिवारात शासकीय जागेवर अवैध गौण खनिज उत्खनन करणारे १ जेसीपी मशीनसह १ डंपर महसूल पथकाने केले जप्त!

शासकीय कॉन्ट्रॅक्टरला महसूलचा दणका!

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील अंजाळे शिवारात तापी नदीच्या किनाऱ्याला लागून असलेल्या शासकीय जागेवर अवैध,बेकायदा गौण खनिज उत्खनन करून वाहतुकीच्या तयारीतअसलेले एका शासकीय कॉन्ट्रॅक्टरच्या मालकीचे एक जेसीपी मशीन आणि एक गौण खनिज वाहतूक करणारे डंपर यावल महसूल पथकाने जप्त केले. सदरची कारवाई आज रविवार दि.५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७:३० ते ८:३० वाजेच्या दरम्यान करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील अंजाळे शिवारात तापी नदीच्या किनाऱ्यावर शेट गट नंबर ५७८ / २ यातील शिल्लक क्षेत्रावर कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग क्र.२ असे शासकीय पाटबंधारे विभागातील अभियंत्याचे नाव आहे. या शासकीय गट नंबर मधून भुसावळ येथील एक नामांकित शासकीय कॉन्ट्रॅक्टर बेकायदा कोणतीही परवानगी न घेता गौण खनिज उत्खनन आपल्या सोयीनुसार आणि मर्जीनुसार करीत असल्याची गुप्त खबर यावल तहसीलदार यांना मिळाल्याने तहसीलदार सौ.मोहन माला नाझीरकर मॅडम,अंजाळे मंडळ अधिकारी रशीद तडवी,टाकरखेडा ग्राम महसूल अधिकारी तेजस पाटील,यावल १ ग्राम महसूल अधिकारी पवन नवगाळे , यावल २ ग्राम महसूल अधिकारी प्रविण मेश्राम,अंजाळे ग्राम महसूल अधिकारी अतुल घाडगे,सांगवी बु. ग्राम महसूल अधिकारी मुकेश तायडे,निमगाव ग्राम महसूल अधिकारी राजू पारधी,तहसिल ड्रायवर अरविंद बोरसे. महसूल पथकाने आज सकाळी घटनास्थळी अचानक भेट देऊन जागेवर आढळून आलेले एक जेसीपी मशीन,१ डंपर यावल तर असेल कार्यालयात आणून जप्त करण्याची कारवाई केली. अवैध गौण खनिज उत्खनन करतानाच्या ठिकाणी जेसीपी मशीन आणि डंपर जे आढळून आले ते एका शासकीय प्रख्यात कॉन्ट्रॅक्टरचे असल्याने, गौण खनिज उत्खनन करण्याच्या उद्योगात संबंधित नाम मात्र रॉयल्टी वरून आपल्या सोयीनुसार वाजवीपेक्षा जास्त अवैध गौण खनिज उत्खनन करून आपली चांदी करून घेत आहे
याकडे यावल तहसीलदार यांनी आपल्या संबंधित मंडळ अधिकारी तलाठी यांच्यामार्फत अंजाळे शिवारातील गौण खनिज उत्खनन झालेल्या जागांची प्रत्यक्ष पाहणी करून उत्खनन किती झाले..? याचे पंचनामे करून गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांनी आतापर्यंत शासनाच्या तिजोरीत किती रॉयल्टी भरली याची चौकशी आणि कार्यवाही केल्यास कोट्यावधी रुपयाचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन करणारे जेसीपी मशीन जागेवर आढळून आलेली शासनाच्या तिजोरीत लाखो रुपयाची भर पडणार आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या