Friday, May 1, 2026
Homeजळगावमहाराष्ट्र शासनाचा सेवा पंधरवड्याचा समारोप हतनूर व मांडवे दिगर येथे उत्साहात पार

महाराष्ट्र शासनाचा सेवा पंधरवड्याचा समारोप हतनूर व मांडवे दिगर येथे उत्साहात पार

महाराष्ट्र शासनाचा सेवा पंधरवड्याचा समारोप हतनूर व मांडवे दिगर येथे उत्साहात पार

वरणगाव         खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          भुसावळ, ता. ४ ऑक्टोबर :
महाराष्ट्र शासनातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व सेवा पंधरवड्याचा समारोप मौजे हतनूर व मांडवे दिगर येथे झाला.या कार्यक्रमांना राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा.संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

हतनूर येथे अतिक्रमणांचे नियमन करून १४० लाभार्थ्यांना सातबारा उतारे वितरित करण्यात आले.मांडवे दिगर येथे गोरबंजारा जातीच्या प्रमाणपत्रांचे वाटप,तसेच शैक्षणिक दाखले व संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत मंजुरीचे प्रमाणपत्रे देण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भुसावळ तहसीलदार नीता लबडे यांनी प्रास्ताविक करताना महसूल प्रशासनाने या पंधरवड्यात गावागावात जाऊन नागरिकांचे प्रश्न समजून घेत त्यावर तोडगा काढत थेट लाभ पोहोचवण्याचे कार्य केले, याविषयी माहिती दिली.या वेळी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील,गटविकास अधिकारी सचिन पानझडे,तसेच संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच,पोलिस पाटील,ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या