Saturday, March 14, 2026
Homeजळगावमहात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

वरणगाव         खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        ता.भुसावळ ४ ऑक्टोबर :
दि १ व ३ ऑक्टोबर रोजी चाळीसगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय, चाळीसगाव येथील विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी करत आपली चमक दाखवली.

या स्पर्धेत १७ वर्ष व १९ वर्ष वयोगटांमध्ये विद्यालयातील भावेश विठ्ठल चौधरी आणि शेख नासीर अन्वर या विद्यार्थ्यांनी विजय मिळवून नाशिक विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. त्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.या दोन्ही खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रिडा शिक्षक आशिष चौधरी,लक्ष्मीकांत नेमाडे,आणि सुनील चौधरी यांचे मोलाचे योगदान लाभले.

या घवघवीत यशाबद्दल शाळासमितीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी हरी बढे सर, संस्थेच्या अध्यक्षा सौ.वंदनाताई पाटील मॅडम,सर्व कार्यकारिणी सदस्य,विद्यालयाचे प्राचार्य सी. जे.तायडे सर,पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

भावेश व नासीर यांचा हा विजय इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, त्यांच्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी संपूर्ण विद्यालयातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या