येथे दोन गावठी कट्टयासह एकास पोलीसांनी घेतले ताब्यात

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येत्या निवडणूकीत अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ .महेश्वर रेड्डी यांनी विभागाला सुचना दिल्या आहेत.
या अनुषंगांने अवैध्यरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमां विरुध्द कठोर करावाई करणे बाबतही आदेशीत केले होते. त्याप्रमाणे राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्था, गुन्हे शाखा, जळगाव यांना गोपनिय माहीती मिळाली की, वरणगाव शहरातील रिकॉर्ड वरील आरोपी नामे संजय चंडेले राहणार वरणगाव ऑर्डनेंस फॅक्टरी हा विना परवाना शस्त्र बाळगुन फिरत असून त्याद्वारे नागरिकांमध्ये दहशत माजवित आहे.
वरणगाव शहरातील तिरंगा चौकात येणार असले बाबत माहीती मिळाल्याने त्यांनी लागलीच स्था. गुन्हे शाखेतील त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार केले. त्यांना वरील माहिती कळविल्या प्रमाणे सदर पथक हे वरणगाव येथे रिकॉर्ड वरील आरोपी नामे संजय चंडेले रा-वरणगाव ऑर्डनेंस फॅक्टरी यास जावुन ताब्यात घेणे बाबत आदेशीत केल्याने पथक वरणगाव शहरात तीरंगा चौकात पोहचले असता पथकास एक संशईत ईसम हा तीरंगा चौकातील झाडा जवळ २३.३० वा चे सुमारास उभा दिसल्याने त्यास पथकातील पोलीस अमलदार यांनी जागीच पकडले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संजय गोपाळ चंडेले वय-५० रा-दर्यापुर शिवार, वरणगाव ऑर्डनेंस फॅक्टरी असे सांगीतले.

त्यानंतर पोलीस पथकाने मिळुन आलेल्या संशयीतांची अंगझडती मध्ये ५०,५००/- रुपये किमंतीचे ०२ गावठी पिस्तोल व ०१ जिवंत काडतुस मिळून आले आहे.
सदर कारवाई बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला. गु.र.क्र. २१३/२०२५, आर्म क्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन नमुद गुन्हयाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष सपकाळ करित आहेत.
तसेच नमुद गुन्हयात आरोपी नामे संजय गोपाळ चंडाले याच्यावर यापूर्वी वरणगाव पोलीस स्टेशनला आर्म अॅक्ट नुसार गुन्हे दाखल आहेत .
सदरची कारवाई .पोलीस अधिक्षक .डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक
नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, यांचे मर्गदर्शनाखाली पो.उ.निरी. शरद बागल, ग्रे पो उनि रवी नरवाडे गोपाळ गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदीवे, श्रीकृष्ण देशमुख, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे भारत पाटील यांनी केली आहे.

