Saturday, October 18, 2025
Homeगुन्हामित्राच्या खोलीवर नेत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल!

मित्राच्या खोलीवर नेत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल!

मित्राच्या खोलीवर नेत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकी देत मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर तरुणाने अत्याचार केला. हा प्रकार एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडला. याप्रकरणी तालुका पोलिस मुन्ना ठाण्यात फरहान उर्फ उसनुद्दीन सैयद (रा. आव्हाणे, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावामधील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही जळगावात टायपिंग क्लासला येते. क्लासजवळ येऊन फरहान सैयद याने माझ्या सोबत फिरायला चालते का, असे विचारले. मुलीने त्यास नकार दिला. मात्र तरुण सतत तगादा लावत होता. जून महिन्यात पुन्हा हा तरुण क्लासजवळ आला व तिला धमकी देऊन दुचाकीवर मित्राच्या घरी घेऊन गेला. त्यानंतर तरुणाने तीन ते चार वेळा मुलीला मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. नंतरही तो पुन्हा-पुन्हा मोबाइलवर बोलत असल्याने मुलीला मानसिक त्रास होऊ लागला. त्यामुळे तिने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

दरम्यान, त्यावरून फरहान उर्फ मुन्ना उसनुद्दीन सैयद याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीला मित्राच्या खोलीवर घेऊन गेल्यानंतर त्याचा मित्र बाहेर थांबला. सदर तरुण हा मुलीला घेऊन घरात गेला व तिच्यावर अत्याचार केला. नंतर तिला रिक्षाद्वारे बसस्थानकावर पाठवून दिले. घाबरून गेल्याने मुलीने कोणाला काहीही सांगितले नाही.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या