Friday, May 1, 2026
Homeगुन्हाविधानसभेत जिंकून देतो म्हणत जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या नेत्याला मागितली ३० लाखांची खंडणी...

विधानसभेत जिंकून देतो म्हणत जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या नेत्याला मागितली ३० लाखांची खंडणी !

विधानसभेत जिंकून देतो म्हणत जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या नेत्याला मागितली ३० लाखांची खंडणी !

पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भाजपच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांना अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनीद्वारे धमकी देत चक्क ३० लाख रुपयांची खंडणी मागीतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर वैशाली सूर्यवंशी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सन २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वैशाली सूर्यवंशी यांनी उमेदवारी केली होती. त्या वेळी वैशाली सूर्यवंशी यांना अज्ञात क्रमांकावरुन फोन आला होता. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने वैशाली सूर्यवंशी यांना कुटनितीने तुम्हाला जिंकुन देतो, असे सांगितले होते. मात्र, वैशाली सूर्यवंशी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान, सप्टेंबर २०२५मध्ये पुन्हा त्या अज्ञात व्यक्तीने वेगवेगळ्या मोबाइलवरुन वैशाली सूर्यवंशी यांना फोन करुन धमकावण्याची भाषा केली. तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत पैसे वाटल्याची आक्षेपार्ह बनावट क्लिप तयार करुन सोशल मीडियावर टाकेल, तसेच इन्कमटॅक्स, सीबीआय, इडी यांच्याकडे तक्रार करेल, अशी धमकी देवून ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

दरम्यान, पैसे न दिल्यास समाजामध्ये तुमची, कुटुबांची बदनामी करेल, तुमच्या गाडीत ड्रग्स ठेवुन बदनामी करेल, अशीही धमकी दिली. दरम्यान, वैशाली सूर्यवंशी यांनी पोलिस ठाणे गाठत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा तपास पो.नि. राहुलकुमार पवार करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या