Monday, July 6, 2026
Homeगुन्हाखळबळजनक : एकाच गावातून तीन अल्पवयीन मुली रात्री रहस्यमयरीत्या बेपत्ता

खळबळजनक : एकाच गावातून तीन अल्पवयीन मुली रात्री रहस्यमयरीत्या बेपत्ता

खळबळजनक : एकाच गावातून तीन अल्पवयीन मुली रात्री रहस्यमयरीत्या बेपत्ता

Oplus_131072

<img class

भडगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील एका गावातून तीन अल्पवयीन मुली एका रात्रीत रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत भडगाव पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना १९ रोजी रात्री घडली. या मुलींना फसवून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की, यात सावत्र बहिणी आणि त्यांच्या गल्लीत राहणारी एक अशा तीन मुलींचा समावेश आहे. यातील दोन मुली या घरात टीव्ही पाहत होत्या. रात्री त्यांचा एक नातेवाईक घरी आला आणि मुली कुठे आहेत, अशी विचारणा त्यांच्या आईला केली. त्यावेळी तिने घरात पाहिले असता दोन्ही मुली घरी नव्हत्या. गल्लीत चौकशी केली असता गल्लीतील एक मुलगीही घरात नव्हती. यानंतर या तीनही मुली कुठेही आढळून आल्या नाहीत. दोघांच्या आईनी २० रोजी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलींच्या तपासासाठी पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. मुलींच्या मोबाइल नंबरवरून लोकेशन शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या