Friday, February 27, 2026
Homeगुन्हाशहरात २० वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट !

शहरात २० वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट !

शहरात २० वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील वरणगाव रोडवरील हॉटेल तनारिका मागील डिफेन्स प्लाझा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीने राहत्या घरातील बेडरूममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ता. १४ रोजी रात्री सुमारे आठ वाजता उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नसल्याने या संदर्भात बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र पाटील करीत आहेत. तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत असून परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या