Friday, May 1, 2026
Homeजळगावमाघारी नंतर भुसावळ–वरणगाव नगरपालिकांच्या निवडणुकीत वाढती चुरस !

माघारी नंतर भुसावळ–वरणगाव नगरपालिकांच्या निवडणुकीत वाढती चुरस !

भुसावळात भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध

५० जागांसाठी २८७ उमेदवार, तर नगराध्यक्ष पदासाठी आठ उमेदवारांची रंगतदार लढत!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ व वरणगाव नगरपालिकांच्या निवडणुकीत माघारीची अंतिम मुदत संपताच राजकीय वातावरण तापले असून दोन्ही नगरपालिकांत उमेदवारांची संख्या निश्चित झाल्यानंतर चुरशीची लढत स्पष्ट दिसत आहे .
भुसावळ नगरपालिकेच्या २५ वार्डाच्या 50 जागांसाठी एकूण 339 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. माघारीच्या तीन दिवसांत तब्बल 92 उमेदवारांनी माघार घेतल्याने अंतिम लढतीत 287 उमेदवार रिंगणात आहेत.नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या 10 अर्जांपैकी स्वाती बाविस्कर आणि रूपाली चौधरी या दोन उमेदवारांनी माघार घेतली असून आता आठ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढत अत्यंत रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख उमेदवारास भाजपच्या रजनी सावकारे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गायत्री भंगाळे,राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आर्शीया खान,संविधान आर्मीच्या पुष्पा सोनवणे ,व इतर अपक्ष उमेदवारांचा समावेश आहेभुसावळ न .पा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत  प्रभाग क्र. ७-ब : प्रीती मुकेश पाटील . प्रभाग क्र. २१-अ : निर्मल (पिंटू) कोठारी . प्रभाग क्र. २३-ब : महिमा अजय नागराणी हे उमेदवार बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले आहे .
यात पिंटू कोठारी यांच्या वार्डातील अशोक चौधरी यांनी वार्डातील नागरिकांनी विनंती करून व कोठारी यांनी कोराना काळात मदत केल्याने पक्षाच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून माघार घेतली आहे असे सांगितले .
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या