भुसावळातील प्रभाग ११ ‘ब’ मध्ये भावना अजय पाटील उमेदवारीचे तगडे आव्हान,प्रचाराला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भुसावळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक ११ ‘ब’ मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार म्हणून भावना अजय पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मतदानाची तारीख जवळ येत असतानाच त्यांच्या प्रचाराने प्रभागात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



