Sunday, January 25, 2026
Homeजळगावपाचोरा तहसिल कार्यालयात नैसर्गिक आपत्तीच्या निधीत अपहार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात...

पाचोरा तहसिल कार्यालयात नैसर्गिक आपत्तीच्या निधीत अपहार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी- एकनाथराव खडसे

पाचोरा तहसिल कार्यालयात नैसर्गिक आपत्तीच्या निधीत अपहार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी- एकनाथराव खडसे

मुक्ताईनगर        खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी   – पाचोरा तालुक्यातील तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या निधीत
कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचे निदर्शनास आले असुन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ एकनाथराव खडसे यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे केली
यावेळी आ.एकनाथराव खडसे म्हणाले जळगाव जिल्ह्यातील
पाचोरा तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती निधी वाटपाच्या
लाभार्थ्यांची बनावट यादी तयार करून १ कोटी २० लाख १३ हजार ५१७ रुपयांचा गैरव्यवहार केल्याची घटना दिनांक १ सप्टेंबर, २०२५ रोजी वा त्यादरम्यान घडल्याचे निदर्शनास आले आहे असुन उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून नैसर्गिक आपत्तीच्या निधीचा लाभार्थ्यांची बनावट
यादी तयार करून गैरव्यवहार करणाऱ्या दोषींविरुध्द कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच सदर निधी आपत्तीग्रस्त लाभार्थ्यांना मिळवून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे याची माहिती द्यावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आ एकनाथराव खडसे यांनी केली
सदर प्रश्नाला महसूलमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले ते म्हणाले
पाचोरा तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती निधी वितरणाच्या बनावट यादीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करते वेळी शेतकरी
अनुदान यादीत रुपये १,२०,१३,५१७/- इतक्या रकमेचा अपहार केल्याचे निदर्शनास आले होते.
परंतु सन २०२३ व सन २०२४ चे शेतकरी अनुदान याद्यांच्या पडताळणीनंतर सदरची आर्थिक अपहाराची रक्कम रुपये २,०७,५०,५९७/- असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रस्तुत प्रकरणी तत्कालीन महसूल सहायक, तहसिल कार्यालय, पाचोरा यांनी शेतकरी नसलेल्या इसमांच्या बँक खात्यावर शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम वर्ग केल्याचे तसेच काही गावांचे मूळ पंचनामे
गहाळ करून खोटे व बनावट पंचनामे तयार केल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित महसूल सहायक व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांचेविरूध्द पाचोरा पोलीस स्टेशन येथे एफ.आय.आर.क्र.४२८/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३१६ (४), ३१६ (५), ३१८(४), ३३५, ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवून अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास
आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांचेमार्फत सुरू असून, सदर प्रकरणात आतापर्यंत ०७ आरोपी असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
संबंधित महसूल सहायक, तहसिल कार्यालय, पाचोरा यांना जिल्हाधिकारी, जळगांव
कार्यालयाच्या दिनांक ०१/०९/२०२५ रोजीच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले असून, त्यांचेविरूध्द
दिनांक ०९/११/२०२५ रोजीच्या ज्ञापनान्वये विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच संबंधित ग्राम महसूल अधिकारी, सारोळा बु., तहसिल कार्यालय, पाचोरा यांना जिल्हाधिकारी, जळगांव
कार्यालयाच्या दिनांक ३०/०९/२०२५ रोजीच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे व संबंधित मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी, पाचोरा यांचा कार्यकाळ दिनांक ३१/०८/२०२५ रोजी समाप्त झालेला आहे.
सदर प्रकरणात ज्या चुकीच्या इसमांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली होती, त्या इसमांना अनुदानाची रक्कम शासनाच्या बँक खात्यावर परत करण्याबाबत तहसिलदार पाचोरा यांचेमार्फत नोटीसा देण्यात आल्या आहेत.
तहसिलदार, पाचोरा यांच्या अहवालानुसार, दिनांक २८/०२/२०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, पाचोरा तालुक्यातील लाभार्थ्यांची संख्या ५२३६४ असून, त्यापैकी ४१७९२ शेतकऱ्यांच्या याद्या ई-
पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत. तसेच १०५७२ शेतकऱ्यांच्या याद्या संमतीपत्र प्राप्त नसल्याने, मयत खातेदार, गावात आढळून न येणारे, व इतर कारणास्तव (बाहेर गावी राहणारे) या
कारणास्तव ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याचे प्रलंबित आहे. अद्यापही ग्राम महसूल अधिकारी
यांचेकडून पात्र शेतकऱ्यांची यादी प्राप्त होताच ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या