Saturday, August 29, 2026
Homeजळगावभुसावळ जंक्शन मध्ये मतदानासाठी सर्व प्रकारचे हातखंडे वापरले जाणार का ..?

भुसावळ जंक्शन मध्ये मतदानासाठी सर्व प्रकारचे हातखंडे वापरले जाणार का ..?

भुसावळ जंक्शन मध्ये मतदानासाठी सर्व प्रकारचे हातखंडे वापरले जाणार का ..?

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरात दि.२० डिसेंबर२०२५ रोजी प्रभाग क्रं. ४ ब तसेच प्रभाग क्रं.११ ब दोन या ठिकाणी नगरसेवक पदांसाठी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.भुसावळ शहरात या आधी काही प्रभागातील मतदान २ डिसेंबरला झाले आहे.
आपल्याला हवा असलेला उमेदवार निवडून येण्यासाठी काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि काही समाजसेवक,तरुण कार्यकर्ते आणि उमेदवारांचे खास कट्टर समर्थक या प्रभागात आणि मतदान केंद्राच्या परीसरात सर्वोतोपरी साम,दाम,दंड,भेद इत्यादी हातखंडाचा वापर करु शकतात अशी संपूर्ण भुसावल जंक्शन शहरात नागरिकांमध्ये आणि मतदारांमध्ये चर्चा आहे.मतदारांना वेगवेगळी आर्थिक कींवा ईतर आमीष दाखवून,आश्वासने देऊन प्रभावीत करू शकतात.? त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलिस प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची मतदारांमध्ये चर्चा आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या