महात्मा गांधी विद्यालयाचा गुजरातमध्ये होणार गौरव : वरणगाव. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

गुजरातमधील अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे एकोणिसाव्या राष्ट्रीय स्तरावरील गणित महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित महोत्सवात देशभरातील दहा निवडक शाळांमध्ये महात्मा गांधी विद्यालयाची निवड झाली असून या शाळांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील गणित महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हा महोत्सव २० ते २२ डिसेंबर दरम्यान अहमदाबाद सायन्स सिटी येथे होणार आहे. या महोत्सवात देशातील २५ राज्यांमधून विद्यार्थी सहभागी होणार असून विद्यार्थ्यांसाठी मॅथ मॉडेल, मॅथ पझल, मॅथ क्विझ, मॅथ रिले, मॅथ पोएम, मॅथ एसे यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी महात्मा गांधी विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रज्वल पाटील, सिद्धांत तायडे, सांकेत पांढरे, साहिल झोपे, मानस पाटील आणि मनीष माळी यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षक एस. आर. मोरे व सुनील वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेच्या चेअरमन वंदना पाटील, प्राचार्य सी. जे. तायडे, उपमुख्याध्यापक बी. एम. राठोड तसेच पर्यवेक्षक डी. आर. कोळंबे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

