Friday, May 1, 2026
Homeजळगावफुलगाव कॉलनीत अघोरी कृत्य आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

फुलगाव कॉलनीत अघोरी कृत्य आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

फुलगाव कॉलनीत अघोरी कृत्य आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वरणगाव       खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                ता भुसावळ
येथील पुष्पलता नगर परिसरात पिंपळाच्या झाडाखाली अघोरी कृत्य आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी सकाळच्या सुमारास नागरिकांना काळ्या रंगाची बाहुली,त्यावर पती-पत्नीची नावे लिहिलेली, तसेच नारळ, लिंबू, फुले व ठेवलेले साहित्य दिसून आले.
या बाहुलीवर अनिल जोहरे त्यांची पत्नी सुनीता यांची नावे लिहिलेली असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित पती-पत्नीने तात्काळ वरणगाव पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या आणि समाजात भीती निर्माण करणाऱ्या कृत्यांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, हे कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी अनिल व सुनीता जोहरे यांनी केली आहे.
पोलीस पुढील तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर बाबींच्या आधारे संबंधितांचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या