Friday, February 27, 2026
Homeजळगावएकानी शेतातील झाडाला घेतला गळफास, कारण अस्पष्ट!

एकानी शेतातील झाडाला घेतला गळफास, कारण अस्पष्ट!

एकानी शेतातील झाडाला घेतला गळफास, कारण अस्पष्ट!

अमळनेर  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                   तालुक्यातील अमळगाव येथील एका ५० वर्षीय व्यक्तीने शेतातील झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना रविवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याबाबत सकाळी ११ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दिलीप अभिमन भिल वय ५० रा. अमळगाव ता. अमळनेर असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.अमळनेर तालुक्यातील आमळगाव येथे दिलीप भिल हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. दरम्यान, पिंप्रळी रस्त्यावरील एका झाडाला त्यांनी रविवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील नातेवाईकांनी त्याला खाली उतरवून रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील हे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या