Friday, May 1, 2026
Homeगुन्हावरणगावात नायलॉन मांजाविरोधात पोलिसांचा धडाका; तळवेल येथे ५,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

वरणगावात नायलॉन मांजाविरोधात पोलिसांचा धडाका; तळवेल येथे ५,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

वरणगावात नायलॉन मांजाविरोधात पोलिसांचा धडाका; तळवेल येथे ५,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                  वरणगाव ता भुसावळ  वरणगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळवेल गावात अवैध नायलॉन मांजाची विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी प्रभावी कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे.आज दि ९ शुक्रवार रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या स्पष्ट आदेशानुसार स्थागुशा पथकाने ही कारवाई केली.

या विशेष पथकात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह पोलिस प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील,सलीम तडवी, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र चौधरी,छगन तायडे व रतन गिते यांचा समावेश होता.पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तळवेल परिसरात सापळा रचून ही कारवाई केली.

कारवाईदरम्यान आरोपी रविंद्र पुरुषोत्तम बोंडे (वय ५७, रा.तळवेल, ता.भुसावळ) याच्याकडून अंदाजे ५,००० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे बंडल तसेच ३०० रुपये किमतीची एक खाली चक्री असा एकूण ५,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नायलॉन मांजामुळे पक्षी,पशुधन तसेच दुचाकीस्वार व नागरिकांना गंभीर दुखापती होण्याचे प्रकार घडत असल्याने शासनाने यावर बंदी घातली आहे.तरीही काही विक्रेते बेकायदेशीररित्या नायलॉन मांजाची विक्री करत असल्याचे निदर्शनास येत आहे.अशा समाजघातक कृत्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर व विक्री टाळावी तसेच अशा बाबींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या