ताई.. शहरात ठीक ठिकाणी बोगस बांधकाम केलेल्या ठेकेदाराला काळया यादीत टाका
यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – ताई तथा नूतन लोकनियुक्त नगराध्यक्षां छाया ताई पाटील आपल्या नगरपरिषद कार्यक्षेत्रात गेल्या ४ ते ५ वर्षाच्या कालावधीत अनेक बांधकामे आणि २ महिन्यापूर्वी यावल शहरात ठीक ठिकाणच्या गटारीवर नवीन ढाप्याची बांधकामे ठेकेदाराने निकृष्ट बांधकाम साहित्य वापरून केली आहे. सर्व ढापे जैसे थे झाल्याचे दिसून येत आहेत. झालेल्या सर्व बांधकामांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांना काळया यादीत टाकण्याची मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे.
प्रशासकीय काळात यावल नगरपरिषद कार्यक्षेत्रात यावल नगरपरिषद मार्फत अनेक अनेक ठिकाणी बांधकामे करण्यात आली आहेत.नगरपरिषद बांधकाम विभागाने बांधकाम सुरू असताना मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे कामे करून न घेतल्याने संबंधित ठेकेदाराने आपल्या सोयीनुसार निकृष्ट प्रतीचे बांधकाम साहित्य वापरून ठीक – ठिकाणच्या गटावरील ढाप्याचे आणि इतर काही बांधकामे निकृष्ट प्रतीची केल्याने धापे आणि काही कामे पुन्हा जैसे थे झाल्याने या संपूर्ण कामांची यावल नगरपरिषद बांधकाम विभागामार्फत चौकशी करून संबंधित ठेकेदारांना काळया यादीत टाकण्याची कार्यवाही करावी अशी यावल शहरात सर्व स्तरातून मागणी होत आहे.



