कलेक्टर म्हणजे ‘कलेक्शन’ करणाऱ्याकडून नगरपरिषद सदस्याला मतदानासाठी दमदाटी.
यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – नगरपरिषद उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडणुकीत मी सांगेल त्याच गटाला मतदान कर नाहीतर मतप्रक्रिया आटोपल्यानंतर तुझ्यावर कारवाई केली जाईल अशी दमदाटी यावल तालुक्यातील कलेक्शन करणाऱ्या एका कलेक्टरने एका नगरपरिषद सदस्याला दिल्याने संपूर्ण यावल शहरातील राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आज गुरुवार दिनांक १५ रोजी यावल नगरपरिषद उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार असल्याने काल दिनांक १४ रोजी यावल शहरातील एका नगरपरिषद सदस्याला तालुक्यात कलेक्शन करणाऱ्या एका कलेक्टरने स्वतः भेटून मी सांगेल त्याच बाजूने मतदान कर आणि नाही केल्यास नंतर तुझ्यावर कारवाई केली जाईल असा दम भरल्याने नगरपालिका क्षेत्रात, राजकारणात,समाजात चांगलेच वातावरण तापले आहे.
सदरची घटना एका जबाबदार लोकप्रतिनिधीने कथन करून पोलीस प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था शांतता अबाधित असताना एक कलेक्शन करणारा कलेक्टर राजकारणातील बाहुलं बनवून नगरपालिका क्षेत्रातील राजकारण गढूळ करून जातीय सलोखा धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याने वेळ पडल्यास याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली जाणार असल्याची माहिती सुद्धा त्या जबाबदार लोकप्रतिनिधीने दिली आहे.
या कलेक्शन करणाऱ्या कलेक्टरवर वरिष्ठांनी कारवाई न केल्यास दि.१४ व १५ रोजी झालेला वार्तालाप,आणि सीसीटीव्ही फुटेज,भ्रमणध्वनी वरील बोलण्याच्या पुराव्या नुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात सुरेश जगन्नाथ पाटील.
पत्रकार यावल.अध्यक्ष- लोक आंदोलन न्यास जळगाव जिल्हा.
उपाध्यक्ष – जळगाव जिल्हा पत्रकार संघ.अध्यक्ष-भारतीय जनसंसद जळगाव जिल्हा.तर्फे तक्रार केली जाईल.


