Friday, May 1, 2026
Homeजळगाववरणगाव नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदी अरुणा इंगळे व दोन स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड

वरणगाव नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदी अरुणा इंगळे व दोन स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड

वरणगाव नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदी अरुणा इंगळे व दोन स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड

वरणगाव      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                ता भुसावळ  वरणगांव नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदी अरुणा इंगळे यांची तर स्वीकृत नगरसेवकपदी शामल झांबरे व राजेंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली वरणगाव नगरपालिकेच्या सभागृहात विशेष सभा संपन्न झाली .याप्रसंगी
पालिकेचे मुख्याधिकारी सचिन राऊत अधिकारी रशिद नौरंगाबादी ,शुभम सोनगीरे, सलोनी लोकनार ,मनिष चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते .
यावेळी नवार्निवाचीत सदस्य सौ.मनिषा माळी,शुभम जावळे,सौ.वैशाली धनगर,सय्यद इरफान अली,
दिपाली माळी, रविंद्र सोनवणे,सौ.वृषाली चौधरी,
निलेश चौधरी,आशफाक शाहा सगीर शाह,शबीना बी इफतेखार बेग,भाग्यश्री सोनवणे,दिपेश पाटील,माधुरी हळदे,श्रध्दा गायकवाड,शबाना जुम्मा खातीक,निलेश खाचणे,वंदना पाटील,माला मेढे,विनोद झोपे,
तृप्ता महाजन उपस्थित होते .

 


उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून अरुणा इंगळे तर शिवसेनेकडून अशफाक शहा यांची उमेदवारी होती यावेळी अशफाक शाह यांनी माघार घेतल्याने अरुणा इंगळे यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यक्ष सुनिल काळे यांनी केली व सत्कार केला .
स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपकडून शामल झांबरे तर शिवसेना (शिंदे गट) कडून राजेंद्र चौधरी यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. कोणताही विरोध न झाल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा नगरपाली केतर्फे सत्कार करण्यात आला .
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे वरणगाव नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नगरपालिकेतील विविध विकासकामे व नागरिकांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
या प्रसंगी नगराध्यक्ष सुनिल काळे व उपनगराध्यक्ष अरुणा इंगळे यांनी वरणगांवच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
निवड झाल्यानंतर गुलालाची उधळण करीत डीजे च्या वादयात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या