वन अधिकारी,कर्मचारी,
नाकेकारकून वृक्षतोड करणाऱ्यांचे संगनमत असल्याने सागवान सह इतर लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि. येथे पूर्व पश्चिम असे दोन स्वतंत्र वनविभाग आहेत यावल शहरापासून फैजपूर शहरापर्यंतचा तथा तालुक्याचा पूर्व भागात वनक्षेत्रपाल अधिकारी त्यांचा कर्मचारी वर्ग नाकेकारकून कारकून असताना यांच्या कार्यक्षेत्रातून दररोज सागवानी लाकडा सह इतर लाकडाची अनेक वाहनातून मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असताना कारवाई मात्र नाम मात्र होत असल्याने याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

यावल शहरात,परिसरात अनेक लाकडाचे,फर्निचर व्यावसायिक व्यापारी,आणि ठराविक सॉमिल चालक,मालक आहेत आहे यांचे सर्वांचे वनविभागाशी कार्यालयीन कामकाजासह हितसंबंध,ओळख परिचय असल्याने कोण केव्हा कसा.,? आपला फर्निचरचा, सागवान लाकूड खरेदी – विक्रीचा व्यवसाय कशाप्रकारे करीत आहे. कोणता व्यापारी अधिकृतरित्या वन विभागाकडून सागवान व इतर लाकूड,वस्तू फर्निचर विक्रीचा व्यवसाय परवानगी काढून / पास घेऊन ( वाहतुकीचा पास घेऊन) करीत आहे किंवा नाही याबाबत नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शेती शिवारात खाजगी मालकीच्या आणि शासकीय जागांवरील तसेच सातपुडा डोंगरातून वन विभागातून सागवानी लाकूड व इतर मौल्यवान लहान मोठ्या वृक्षाची सर्रासपणे कत्तल करून वेगवेगळ्या वाहनातून वाहतूक केली जात आहे.या अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यां वाहनाचे वजन माप यावल कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील व इतर ठिकाणच्या तोल काट्यावर भर दिवसा व रात्री करून पाहिजे त्या ठिकाणी आणि जिल्ह्यात वाहतूक केली जाते. वाहतूक करताना वाहनात कोणते आणि किती घनफूट लाकूड आहे याची खात्री देणारे वाहतूक करणारे अधिकारी, कर्मचारी,नाके प्रत्यक्षात करतात का.? किंवा ओळख परिचयामुळे हितसंबंध साधून वाहन सोडले जाते का.? याबाबत तालुक्यात चर्चा आहे.

नाम मात्र कारवाई….
यावल पूर्व किंवा पश्चिम वनविभागात दररोज लाकडाची तस्करी सुरू आहे पण दोन-तीन महिन्यातून अवैध लाकडाची तस्करी करणाऱ्यांवर एखादी कारवाई केली जाते आणि त्यातील आरोपी सुद्धा पकडले जात नसल्याने आरोपी सोडले जातात की आरोपी पळून जाण्यात यशस्वी होतात..? ठीक ठिकाणी वन विभागाने वन समित्या स्थापन केल्या जातात समितीचे सदस्य वनविभागाला माहिती देत नाही का..? वनविभागाच्या या कारवाईबाबत नागरिकांमुळे संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे यावल पूर्व व पश्चिम वन विभागाने दररोज अवैध लाकडाची वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

