तीन दिवसाचा राज्य दुखवटा आयुक्त यांच्या सूचनेची पायमल्ली.?
यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – गुरुवार दि.२९ रोजी यावल येथे आदिवासी विभागाच्या वतीने आदिवासी पाडा वस्तींच्या विकास कामांची सिईओ, आणि यावल पंचायत समिती बीडीओ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या उपस्थित जी बैठक झाली. परंतु राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दि.२८ जानेवारी रोजी दुखद निधनामुळे सर्व शासकीय कार्यालय बंद ठेवण्याबाबत आणि राज्यात ३ दिवसाचा राज्य दुखवटा पाळला जाईल या काळात कोणतेही अधिकृत शासकीय कर्मणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाही अशी विभागीय आयुक्तांची सूचना असताना यावल पंचायत समिती सभागृहात जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीबाबत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात, यावल तालुक्यात चर्चेचा विषय सुरू आहे. तसेच बैठक आयोजित करणाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सुद्धा अंधारात ठेवून त्यांना कोणतीही माहिती दिली नसल्याचे प्रसिद्धी माध्यमात बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागा अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल्य पेसा गावांच्या शासकीय पातळीवर होणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासंदर्भात जळगाव जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार व पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड,सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहूरे,पुर्व विभागाचे वनपरिश्रेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे,यावल तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी तथा जिल्हा परिषद स्तरावरील तिघ तालुक्यातील अधिकारी सरपंच, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत यावल पंचायत समितीच्या सभागृहात यावल,रावेर,चोपडा या तालुक्यातील पेसा अंतर्गत येणाऱ्या आदिवासी पाडा वस्ती गावांच्या विविध विषयांवर तसेच आदिवासी समाजाचे हक्क आणि अधिकारी या बाबतच्या कामांना शासकीय पातळीवर गती मिळावी म्हणुन बैठक्र घेण्यात आली.या बैठकीत पेसा अंतर्गत येणाऱ्या गांवांची आरोग्य सेवा,पाणी पुरवठा,घरकुल योजना, अंगणवाडी,आदिवासी वस्ती पाडयां वरील शाळांची व रस्त्यांच्या माहितीचा आढावा घेण्यात आल्याची जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी ठराविक संबंधितांना दिली.या बैठकीबाबत आयोजकांनी पत्रकारांना कोणतीही सूचना दिली नाही.