Friday, May 1, 2026
Homeजळगावउच्च माध्यमिक विद्यालयातील २ विद्यार्थिनींना पळवून नेण्याचा प्रयत्न!

उच्च माध्यमिक विद्यालयातील २ विद्यार्थिनींना पळवून नेण्याचा प्रयत्न!

उच्च माध्यमिक विद्यालयातील २ विद्यार्थिनींना पळवून नेण्याचा प्रयत्न!

तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ!

यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – उच्च माध्यमिक विद्यालयातील २ विद्यार्थिनींना आज सोमवार दि.२ रोजी दुपारी शाळेच्या आवारापासून ५ ते ६ किलोमीटर अंतरापर्यंत पळून नेल्याचा अयशस्वी प्रयत्न अज्ञात तरुणांनी केल्याने तालुक्यात शिक्षण क्षेत्रात समाजात,राजकारणात मोठी खळबळ उडाली असली तरी याबाबत पोलिसात कोणीही फिर्याद तक्रार न दिल्यामुळे कोणतेही नोंद नसल्याची माहिती ठाणे अंमलदार यांनी आज दि. २ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास दिली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तालुक्यातील एका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील २ मुलीना बेशुद्ध करण्यासाठी क्लोरोफॉर्म युक्त रसायन किंवा वायू रुमालावर टाकून त्या दोन विद्यार्थिनींना सुंगवून त्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयापासून अंदाजे ५ ते ६ किलोमीटर अंतरावर पर्यंत नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची चर्चा संपूर्ण यावल तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली.
त्या मुली नेमक्या कोण.? कुठल्या.? आणि कोणत्या उच्च माध्यमिक विद्यालयातील आहेत. पळून नेणारे अज्ञात विद्यार्थी कोण आहेत.? काही इतर कोणी बाहेरचे विद्यार्थी किव्वा अनोळखी मनुष्य आहेत का.? याबाबत तसेच त्या विद्यार्थिनींनी त्या महाविद्यालयाचा निश्चित केलेला ड्रेस ( पोशाख ) परिधान केलेला होता किंवा नाही.? आणि नसेल तर संबंधित शिक्षकांनी त्या विद्यार्थिनींना विद्यालयाच्या बाहेर काढले होते का.? त्या २ विद्यार्थिनी कोणत्या वर्गात आहेत आणि त्यांच्या वर्ग शिक्षक प्रमुख कोण.? त्यांनी काय दक्षता घेतली.? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून जोरदार चर्चा आहे.याबाबत विद्यालयाचे जबाबदार प्रमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आज जळगाव येथे आगामी परीक्षा संदर्भात जिल्ह्यातील सर्व जबाबदार प्राचार्य मुख्याध्यापक यांची महत्त्वाची मीटिंग असल्याने त्या जबाबदार प्रमुखांनी याबाबतची पूर्ण माहिती
नसल्याचे सांगून संबंधित शिक्षकांची संपर्क साधायला सांगून घडलेल्या चिंताजनक घटनेला दुजोरा दिला आहे.तरी त्या उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या भवितव्यासाठी जबाबदार संबंधित काय कारवाई करतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या