अप्रिय घटना टाळण्यासाठी साने गुरुजी विद्यालयाचे पूर्व बाजूचे प्रवेशद्वार पुन्हा सुरू करण्याची मागणी.

नगरसेवक योगेश चौधरी
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.५
नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी,विद्यार्थिनी येता जाताना अनुचित घटना होऊ नये म्हणून विद्यालयाचे पूर्व बाजूचे बंद केलेले प्रवेशद्वार पुन्हा सुरु करण्याची मागणी नगरसेवक योगेश विजय चौधरी,चेतन आढळकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी केली आहे.
दि.५ फेब्रुवारी २०२६ रोजी यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असून ते यावल नगर परिषदच्या अंतर्गत आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी माजी लोकप्रतिनिधींनी काही तरी बदल करावा म्हणून ३० ते ४० वर्षांपूर्वीचे असलेले मुख्य प्रवेशद्वार बंद करून विद्यालयाचे पश्चिम बाजूने प्रवेशद्वार केले आहे हे गेट विद्यार्थी यांच्या सोई नुसार नसल्याने विद्यार्थिनींच्या दृष्टीने चुकीचे आहे,तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींना येण्या जाण्यासाठी सोयीचे नसल्याने अनुचित घटना घडू नये म्हणून पूर्व बाजूचे पुर्वीचे समोरील प्रवेशद्वार सुरू करण्यात
यावे जेणेकरून गैर प्रकार होणार नाही म्हणून तत्काळ पूर्वेकडील प्रवेशद्वार सुरू करावे अशी मागणी नगरसेवक योगेश विजय चौधरी, चेतन आढळकर,यांचे समर्थक रितेश शिवाजी बारी,सोहन प्रमोद कोळंबे,नितीन संजय बारी,अनिल नेमाडे,दिनेश चौधरी,उज्वल कानडे,पंकज पवार,शैलेश पवार,
अमोल देशमुख,जितेंद्र चौधरी,
व्यंकटेश प्रभाकर बारी,रोशन यवले,किरण तायडे,मुकेश कोळी,
अतुल चौधरी,तुषार पाटील,हितेंद्र गजरे यांनी निवेदनावर आपली स्वाक्षरी करीत मागणी केली आहे.

