यावल येथे श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम.
सेवाभावी संस्थेतर्फे जय्यत तयारी.
यावल खानदेश ला इंग्लिश प्रतिनिधी दि.५ येथील श्री गजानन महाराज सेवाभावी संस्थेतर्फे श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त रविवार दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
दि. ८ रोजी सकाळी ६ वाजता श्री च्या मूर्तीचा अभिषेक व आरती, ७ वाजता लघु श्री विष्णू याग, ८ वाजता यावल शहरातील श्री रेणुका देवी मंदिरापासून श्री गजानन महाराजांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक विरारनगर मधील श्री गजानन महाराज मंदिर पर्यंत काढली जाईल.दुपारी १२ वाजता श्री विष्णू यागाची पूर्णाहुती व महाआरती,नंतर १२ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप,दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री तारकेश्वर महादेव भजनी मंडळ यावल यांचा भजनाचा कार्यक्रम, रात्री ७ वाजता श्री ची आरती व रात्री ८ वाजता ह.भ.प. राजेंद्र अंबिकार (रा.केकत निंभोरे तालुका जामनेर ) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा तसेच कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करीत
दि. ८ रोजी महाप्रसादासाठी ज्या भाविकांना देणगी अथवा ११ , २१ , ५१ पोळ्या ( चपात्या ) किंवा भाकरी द्यावयाच्या असतील त्यांनी रविवार दि. ८ रोजी विरार नगर मधील श्री गजानन महाराज मंदिर येथे येथे दुपारी तीन वाजेपर्यंत आणाव्या अशी विनंती श्री गजानन महाराज सेवाभावी संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

