Saturday, February 7, 2026
Homeजळगावमॉर्निंग वॉक करणारे २ मोटरसायकलवरील लैला मजनूचा चर्चेचा विषय.

मॉर्निंग वॉक करणारे २ मोटरसायकलवरील लैला मजनूचा चर्चेचा विषय.

मॉर्निंग वॉक करणारे २ मोटरसायकलवरील लैला मजनूचा चर्चेचा विषय.

यावल       खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             दि.५    येथील बोरावल रस्त्यावर दररोज सकाळी मॉर्निंग वॉक करणारे २ मोटरसायकलवरील लैला मजनूचे
अश्लील चाळे आणि रंगेल लिला बाबत यावल शहरात चर्चेच्या विषयासोबत मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की बोरावल रस्त्यावर दररोज सकाळी मॉर्निंगवॉक करण्याच्या बहाण्यातून २ मोटरसायकलीवर २ तरुण,२ दोन तरुणींना डबलसीट बसवून ( तरुणीच्या तोंडावर स्कार्पबांधून संपूर्ण चेहरा झाकून ) सुसाट वेगाने येऊन पाटाजवळ दररोज सकाळी अनेक मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या समक्ष जाणून बुजून अश्लील चाळे,रंगेल लिला, लज्जास्पद कृत्य करीत असल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्या स्री-
पुरुषांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याकडे समाजसेवकांनी,सामाजिक संघटनांनी,पोलिसांनी लक्ष केंद्रित करून तातडीने कारवाई करावी अशी यावल शहरात चर्चा आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या