साने गुरुजी विद्यालयात मंगळवार दि.10 फेब्रुवारी 2026 पासून इयत्ता 12 वी परीक्षा सुरू.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.7
यावल नगर परिषद संचलित सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन 2025 – 26 इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षा केंद्र क. 0811 मधील परीक्षार्थींची बैठक व्यवस्था मुख्याध्यापक एम.के.पाटील यांनी पुढील प्रमाणे केली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार नमूद करण्यात आले आहे की,उच्च
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता १२वी फेब्रुवारी-मार्च
२०२६ यावल नगर परिषद संचालित, पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,यावल येथे केंद्र क्रमांक 0811 असून परीक्षा केंद्रावर कला,विज्ञान,व वाणिज्य विध्यार्थी परीक्षा देत असून यात नियमित विद्यार्थी व खाजगी विद्यार्थी तसेच पुनर परीक्षार्थी विद्यार्थी हे परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार असून केंद्र ०८११ पुढील प्रमाणे त्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली
आहे.
कला शाखा S 142393 ते S 142619, विज्ञान शाखा S 082870 ते S 082995, वाणिज्य शाखा S 168473 ते S 168545 या पध्दतीत बैठक
व्यवस्था यावल नगर परिषद संचालित,पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,यावल. केंद्र क्रमांक ०८११ वर बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.तसेच परीक्षा केंद्रावर पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास आधी
परीक्षार्थी यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे आव्हान मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक एम.के.पाटील सर यांनी केले आहे.

