जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये १० वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१०
दि.९ फेब्रुवारी २०२६ रोजी यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मधील इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संस्थेचे चेअरमन शरददादा महाजन व मान्यवर संचालकांसह, शिक्षक वृंदांच्या उपस्थितीत आनंददायी,
भावनिक वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी व्यास शिक्षण शिक्षण मंडळाचे असिस्टंट सेक्रेटरी ए.बी.महाजन सर,आय.टी.आयचे प्राचार्य गिरीश वाघुळदे सर सेमी माध्यमाच्या प्राचार्या सौ.रंजना महाजन मॅडम तसेच इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे मॅडम,प्रवीण झोपे, सर पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे, मॅडम व सौ.गौरी भिरूड मॅडम उपस्थिती होत्या.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व स्वर्गीय जे.टी.महाजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या प्रसंगी शाळेच्या संपूर्ण आठवणींना उजाळण्यात शाळेबद्दल व शिक्षकांबद्दल प्रेम व्यक्त करत व शिक्षकाने दिलेल्या संस्कार वर्तणूक चांगले विचार व येणाऱ्या व्यक्ती भवितव्यासाठी केलेले मार्गदर्शन यांची कृतज्ञ बाळगून विद्यार्थी,विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी सर्व शिक्षक भावनाविभोर झाले.
यानंतर शाळेची आठवण म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आली.शाळेच्या सर्व शिक्षकांसह येवले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक गोष्टींची आवड आहे त्यात करिअर बनवण्याचा सल्ला दिला नंतर शाळेच्या प्राचार्या सौ.रंजना महाजन मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगाचे भान ठेवून स्वतःचे स्किल डेव्हलप करावे असे मार्गदर्शन केले.तर सेक्रेटरी ए.बी.महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे अष्ट सूत्र सांगून आपण आपल्या शिक्षणा बरोबरच आपला सर्वांगीण विकास किती महत्त्वाचा असतो सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आ.य.टी.आय चे प्राचार्य गिरीश वाघुळदे सरांनी स्वामी विवेकानंदाप्रमाणे ध्येयनिश्चिती करा असे मार्गदर्शन केले.त्यानंतर अध्यक्षीय भाषणातून कार्यक्रमाचे अध्यक्ष शरदभाऊ यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात काम करा परंतु ते उत्कृष्ट पद्धतीने करा तरच त्या प्रयत्नांना महत्त्व प्राप्त होईल तसेच आई-वडिलांनी जे स्वप्न तुमच्या प्रगतीसाठी बघितले आहे.ते सर्व स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची राहील असे म्हणत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.तसेच सर्वोत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रकमी बक्षीस जाहीर केले.त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अर्चना पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.मनीषा पाटील मॅडम यांनी केले.कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना अतिथी तसेच शिक्षक आहेत तर कर्मचारी यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

