Saturday, February 21, 2026
Homeजळगावयावल - भुसावळ सिमेंट काँक्रीट रस्ता एक ते दीड वर्षाच्या आत फूटून...

यावल – भुसावळ सिमेंट काँक्रीट रस्ता एक ते दीड वर्षाच्या आत फूटून लांब लचक भेगा पडल्याने संबंधित यंत्रणेवर फौजदारी, दिवाणी कारवाईची मागणी.

यावल – भुसावळ सिमेंट काँक्रीट रस्ता एक ते दीड वर्षाच्या आत फूटून लांब लचक भेगा पडल्याने संबंधित यंत्रणेवर फौजदारी, दिवाणी कारवाईची मागणी.

तालुकाध्यक्ष- आकाश चोपडे.

यावल       खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             दि.११
यावल भुसावळ आणि निमगाव दरम्यान सिमेंट काँक्रीटचा रस्ता एक ते दीड वर्षाच्या आतच फुटल्याने रस्त्यावर खड्डे पडून लांब लचक भेगा पडल्या म्हणून नागरिकांचे जीवितच धोका निर्माण झाल्याबद्दल कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई करणेची मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यावल तालुका अध्यक्ष आकाश चोपडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक,यावल पोलीस निरीक्षक पोलीस यांच्याकडे दि.११ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या निर्णयात नमूद केले आहे की मी स्वतः व माझे मित्र जुगल पाटील दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी रोजी स्वतः यावल भुसावळ रस्त्याने प्रवास करत असताना आमची गाडी स्लिप झाली व मोठा अपघात टळला या आधी सुद्धा या रस्त्यावर अपघात घडले आहेत.हा रस्ता गेल्या एक वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून सिमेंट काँक्रिटीकरण करून बांधण्यात आलेला आहे तरी यात महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम परिपत्रक क्र.संकीर्ण २०१७ / प्र क / ९ / नियोजन ३ मंत्रालय मुंबई २७ / ४ / २०१७ नुसार डांबरी रस्त्याचे आयुर्मान १५ वर्षे व काँक्रीट रस्त्याचे किमान ३० वर्ष गृहीत धरून संकल्पना करण्यात यावे आणि अशाप्रकारे काम न केल्यास व नंतर प्रशासकीय मान्यता प्राप्त लांबी खड्डे पडल्यास काम खराब झाल्यास किंवा पूल पडल्यास त्याची सर्व जबाबदारी कंत्राटदार व संबंधित पर्यवेशकीय अधिकारी यांची राहील त्या संबंधाची विशेष अट निवेदनात नमूद करावी. ही कारवाई सिविल क्रिमिनल स्वरूपाची राहील याची नोंद संबंधितांनी घेतली आहे असे प्रमाणपत्र निवेदन मध्ये जोडावे व त्यावर कंत्राटदाराची सही घ्यावी तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याची जाणीव लिखित स्वरूपात कळवावी तांत्रिक मान्यता देतांना संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी याची नोंद तांत्रिक मंजुरी आदेशात करावी व तसे अभिलेखांमध्ये ठेवावे या अटीचाही काम निहाय समावेश इतर अटीसह करण्यात आलेला आहे.
असे स्पष्ट परिपत्रकात नमूद असल्याने या कालावधीत जर रस्त्यावर खड्डे पडले किंवा काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळले तर संबंधित कंत्राटदार तसेच पर्यवेशकीय अधिकारी हे फौजदारी व दिवाणी जबाबदारी पात्र ठरतात.
त्यानुसार यावल भुसावळ हा रस्ता गेल्या वर्षापूर्वी सिमेंट काँक्रीट निकृष्ट साहित्य वापरल्याने,आणि ठेकेदार आणि संबंधित बांधकाम शाखा अभियंता,तथा निरीक्षण अधिकारी यांनी संगनमत करून रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्याचे काम न केल्याने सिमेंट काँक्रीटच्या हा रस्ता एक ते दीड वर्षाच्या आत फुटून रस्त्यावर उभ्या लांब भेगा आणि खड्डे पडले.

सिमेंट काँक्रीट रस्त्याचे आयुर्मान तीस वर्षाचे असताना यावल भुसावळ रस्त्याचे दीड वर्षाच्या आत १२ वाजल्याने बांधकाम विभागातील जबाबदार संबंधित अधिकारी आणि ठेकेदार हे
फौजदारी व दिवाणी कारवाईस पात्र ठरतात.त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी स्वतः फिर्यादी येऊन फौजदारी दिवाणी कार्यवाही करावी अशी मागणी वजा निवेदन तक्रार युवक राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष आकाश सतीश चोपडे यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष जुगल पाटील,
शहराध्यक्ष योगेश पाटील, सेना विद्यार्थी सेना यावल शहराध्यक्ष प्रेम देवरे,गोलू महाजन,
किरण महाजन,रोहित महाजन वैभव कोळी,गोलू कोळी,योगेश कोळी,जुनेद खान,अल्तमस शेख, इत्यादी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या