Friday, May 1, 2026
Homeजळगावकेंद्र संचालकाचे हमीपत्र आणि माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याचे अर्थपूर्णदुर्लक्ष.

केंद्र संचालकाचे हमीपत्र आणि माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याचे अर्थपूर्णदुर्लक्ष.

केंद्र संचालकाचे हमीपत्र आणि माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याचे अर्थपूर्णदुर्लक्ष.

यावल परीक्षा केंद्रात परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा तीव्र संताप.

यावल        खानदेश ला इंग्लिश प्रतिनिधी         दि.१०
यावल येथील परीक्षा केंद्रावर आज कॉपी प्रकरणामुळे एका परीक्षा केंद्र प्रमुखाच्या तथा मुख्याध्यापकाने केंद्रप्रमुख होण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे जे हमीपत्र भरून दिले ते हमीपत्र केंद्र संचालकाने कचराकुंडीत टाकून शिक्षणाधिकाऱ्यांची दिशाभूल केली असल्याची चर्चा अनेक परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह पालकात सुरू झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल येथील परीक्षा केंद्रात
एका ब्लॉकमध्ये विद्यालयातीलच एक महिला कर्मचारी परीक्षार्थी म्हणून आजच्या पहिल्या विषयाचा पेपर देत असताना मोबाईलच्या माध्यमातून कॉपी करीत असल्याचे इतर परीक्षार्थी विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रत्यक्षात दिसून आले. त्या ब्लॉगच्या सुपरवायझर बाबत सुद्धा संशय व्यक्त केला जात असून तो मोबाईल कोणाचा आणि त्या ब्लॉक मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते की सुरू होते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असतील तर त्या ब्लॉक मध्ये नेमके काय झाले हे चौकशी समोर येईल. आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद असेल तर कॅमेरे बंद का ठेवले याची सुद्धा चौकशी शिक्षण अधिकाऱ्यांनी, किंवा संबंधित तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी केल्यास वस्तूस्थिती समोर आल्याशिवाय राहणार नाही.

 


बोर्डाच्या परीक्षेत कॉपी आढळल्यास संस्थाचालकांवर गुन्हा दाखल होणार असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध केल्यावर सुद्धा कॉपी प्रकरण समोर आल्याने आता नेमकी कारवाई काय.? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

परीक्षेसाठी माझा / माझी पती / पत्नी / मुलगा / मुलगी / भाऊ / बहीण या पैकी कोणताही नातेवाईक कोणत्याही केंद्रामध्ये प्रविष्ठ नाहीत.मला मंडळाच्या कामास कायमचा / तात्पुरता प्रतिबंध करण्यात आलेला नाही.
मी राज्य मंडळ, पुणे किंवा नाशिक विभागीय मंडळ यांच्या कोणत्याही समितीचा / अभ्यास मंडळाचा सदस्य नाही.मी परीक्षेच्या संपूर्ण कालावधीत व परीक्षेचे प्रत्येक सत्र संपेपर्यंत केंद्र संचालक म्हणून उपरोक्त केंद्रावर उपस्थित राहीन, तसेच मंडळाच्या पूर्व परवानगी शिवाय दुस-या कोणत्याही परीक्षेचे काम स्विकारणार नाही.
माध्यमिक / उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे संदर्भात मंडळाने माझ्याकडे सुपूर्द केलेल्या सर्व गोपनीय कागदपत्रांची गोपनियता ठेवण्याची जबाबदारी माझीच राहील.माझी यापूर्वी खाते निहाय चौकशी झाली नाही किंवा सध्या सुरू नाही / किंवा अन्य कोणत्याही चौकशीत मला दोषी
ठरविण्यात आलेले नाही.

 


सदर नियुक्ती ही अंतिम स्वरुपाची आहे याची नोंद घेतली असूनती मी कोणत्याही कारणा करिता रद्द करणार नाही.परीक्षा कालावधीत मी पूर्णवेळ मुख्यालयात राहील.
अशाप्रकारे हमीपत्र यावल शहरातील परीक्षा केंद्रप्रमुखाने भरून दिलेले असताना त्या केंद्रात त्या केंद्रप्रमुखाचे रक्ताचे नातेवाईक परीक्षार्थी आहे. तसेच शाळेतीलच एक महिला कर्मचारी परीक्षार्थी असताना त्या परीक्षार्थी कडे मोबाईल कोणी दिला व तो मोबाईल कोणाच्या मालकीचा होता आणि आहे. तसेच इतर विद्यार्थ्यांना, परीक्षार्थींना कॉपी का करू दिली नाही त्यामुळे ते परीक्षार्थी संतप्त होऊन त्यांनी प्रथम केंद्र संचालक नंतर शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात जाऊन जाब विचारला परंतु तालुका शिक्षण अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली आणि जळगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडे काय माहिती पाठवली. तसेच यावल परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकरणात परीक्षार्थी मध्ये अशाच प्रकारे भेदभावाची वागणूक दिली जाणार आहे का.? याची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी अशी परीक्षार्थी व त्यांच्या पालकांकडून मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या