Wednesday, February 11, 2026
Homeजळगावविद्यार्थ्यांच्या किल्ला प्रदर्शनाने पालकांची मने जिंकली; पालक-शिक्षक संघाची सभा यशस्वी

विद्यार्थ्यांच्या किल्ला प्रदर्शनाने पालकांची मने जिंकली; पालक-शिक्षक संघाची सभा यशस्वी

विद्यार्थ्यांच्या किल्ला प्रदर्शनाने पालकांची मने जिंकली; पालक-शिक्षक संघाची सभा यशस्वी

जळगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी पालक-शिक्षक संघाची सभा क्रमांक ४ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्त तयार केलेल्या विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे आकर्षक प्रात्यक्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. राजगडसारख्या किल्ल्यांच्या सुंदर मॉडेल्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व मेहनतीचे मनापासून कौतुक केले.
इयत्ता सहावीतील विद्यार्थी राज दांडगे, अमित तडवी, कन्हैया संदीप पाटील ,समर्थ जाधव, यश घोडेराव शिवम गोसावी, नैतिक पाटील, मानव निंबाळकर, निशांत मोहरकर, हिमांशू मोहरकर, महेश जाधव, कार्तिक गोंधळी, हार्दिक पाटील, वेदांत खराटे व नैतिक मिस्त्री यांनी किल्ल्यांची उत्कृष्ट निर्मिती करून विशेष लक्ष वेधले.
सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली तसेच शाळेतील विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याची भावना दृढ करण्यात आली.
मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक व पर्यवेक्षिका सौ. शितल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या